Home नांदेड लॉकडाऊन काळात घराबाहेर पडाल तर कारवाई – सपोनि. भालचंद्र तिडके

लॉकडाऊन काळात घराबाहेर पडाल तर कारवाई – सपोनि. भालचंद्र तिडके

426

मजहर शेख,

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्याची गय केली जाणार नाही.

नांदेड/किनवट,दि. 25 :-  नांदेड जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणू चा पसार होऊ नये यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी २४ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत ११ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असून या काळात कोणीही घराबाहेर निघू नये आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून सुध्दा काहिही काम नसताना काहीजण कामाचा हिला करून घराबाहेर निघत आहेत. जो कोणीही बिनकामाचा घराबाहेर निघाल्यास आपली वाहनाचे जप्ती सह गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी दिला आहे.
सारखणी परिसरातील नागरिक मात्र या आजाराची गंभीरता न जाणून घेता,बिनधास्तपणे वागताना दिसत आहे. नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन असताना आणि संचारबंदी असताना विनाकारण मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना, वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी सिंदखेड पोलीस स्टेशनचे सपोनि भालचंद्र तिडके यांनी कडक कारवाई केल्यामुळे रिकामी टेकड्याना चांगला धसका घेतल्याचे चित्र सारखणी व परिसरात दिसू लागले आहे.सपोनी निरिक्षकांच्या कारवाईने मोकाट, विनाकारण, दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना नसताना मोकाट फिरणाऱ्यावर आणि बिनकामाचा घराबाहेर निघाल्यास आपली वाहनाचे जप्ती सह गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी दिला आहे.