Home विदर्भ दोन दुचाकीच्या अपघातात चार जण गंभीर जखमी.

दोन दुचाकीच्या अपघातात चार जण गंभीर जखमी.

396

इकबाल शेख

वर्धा / ‌तळेगांव (शा.प.) :- तळेगाव आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाट्या जवळ दोन दुचाकी ची समोरा समोर धडक होवून झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहे.तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.


सविस्तर वृत्त असे की, अनिकेत साहेबराव कडू रा.बोरगाव हातला. वय 26 व प्रवीण जानराव पांडे राहणार जामगाव खडका. वय 32 वर्ष दोघे ही एमएच 27 बी सी. 7282 क्रमांकाच्या दुचाकीने वरूड वरुन आर्वी च्या दिशेने जात असताना तळेगाव कडून आष्टी कडे जात असलेल्या दुचाकी क्र.एम एच 32 ए.पी.3055 ने जोरदार धडक दिली. त्या दुचाकी वरील प्रवास करणारे अन्वय शेंडे रा. महावीर नगर, अमरावती व बबलू धवस आष्टी हे सुद्धा गंभीर जख्मी झाले. सदर घटना सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान घडली. तळेगाव येथील नागरीकांनी घटना स्थळाकडे धाव घेवुन स्थानिक नागरीकांनी व रोडने जाणार्‍या नागरिकांनी तळेगाव पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीसानी घटना स्थळावर येत सिडीएट कंपनीची अंबुलेन्स बोलावून गंभीर जखमींना अमरावती येथील दवाखान्यात उपचार करिता पाठविण्यात आले. तळेगाव पोलीस घटना स्थळी दाखल होवुन सदर घटनेची नोंद घेतली.असून या पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये जमादार संजय शिंगणे,राहुल अमुने,रोशन करलुके हे करीत आहे.