Home नांदेड देगलूर भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार साईनाथ कावटवार यांची निवड

देगलूर भाजपा तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार साईनाथ कावटवार यांची निवड

115
0

राजेश एन भांगे

पत्रकार साईनाथ कावटवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची भारतीय जनता पार्टी देगलूर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले व तसेच या नियुक्तीच्या वेळी भीमराव केराम (आमदार,किनवट), व्यंकटराव पाटील गोजेगावकर (जिल्हाध्यक्ष, भाजपा नांदेड ग्रामीण), गंगाधरराव जोशी (संघटन मंत्री तथा माजी नगराध्यक्ष न.पा.देगलूर), दिगंबर कौरवार (देगलूर शहर शक्ती केंद्र प्रमुख), राहुल पेंडकर व भाजपा कार्यकर्ते आदी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.