Home जळगाव सावखेड्यात टरबूज कापून वाढदिवस साजरा… छान उपक्रम

सावखेड्यात टरबूज कापून वाढदिवस साजरा… छान उपक्रम

170
0

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील सावखेडा येथील लोकमतचे वार्ताहर योगेश सैतवाल यांनी आपल्या मुलगा चिरंजीव वेदांत याचा दिनांक १९ मार्च रोजी वाढदिवसाला केक ऐवजी कलिंगड कापून वाढदिवस साजरा केला.
दिसायला छोटा आहे, परंतु क्रांतिकारी विचार आहे.
केक ऐवजी कलिंगड कापून वाढदिवस साजरा करणे हा एक छान उपक्रम आहे. फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करा. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार वाढेल. जर शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर आपल्या वाढदिवसा निमित्ताने एकाच शेतकऱ्याचं फळ खरेदी करून त्याला मदत होते का हा पण यांच्यात विचार आपल्या कृतीतून उतरवला तर शेतकऱ्या त्यांच्या मालाला एक चांगला दर भेटेल..
कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने जर आपण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा केक ऐवजी फळांचा वापर केला तर निश्चितच आपल्या आरोग्याला सुद्धा याचा फायदा आहे. केक मध्ये असणारे केमिकल वेगवेगळ्या रासायनिक मिश्रणापासून आज आपण अगोदरच त्रस्त झालेला आहेत उत्तम आहार मिळत नाही. त्यातून असे पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचा वापर आपण जर केला तर महाराष्ट्रातला देशातला शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा येणाऱ्या पिढीतल्या तोरणांनी विचार केला पाहिजे शहरांमध्ये असंख्य लोक केक वरती खर्च करतात केक तोंडाला लावतात फेकून देतात परंतु आपण कापलेला केक आपल्या वाढदिवसानिमित्त हा जर फळाचा असेल तर तो प्रत्येक आपला मित्र जो आपला वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी आलेला आहे तो त्याची चव आनंदाने चाखू शकतो आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला उत्तम आहार तुमच्या माध्यमातून मिळू शकतो. असां विचार कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास ताठे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ताठे,उपसरपंच सविता संतोष नवले, विकास पाटील, तालुका अध्यक्ष पदवीधर संघांचे किरण पाटील, अनिल पाटील, साईनाथ अग्रो,
सांरग पाटील, युवराज कराड, बी यु पाटील, प्रदीप महाजन,
संतोष नवले,किरण पाटील, शिवसैनिक,हे उपस्थित होते.