Home महत्वाची बातमी अकोल्यात भाजप ठरली किंगमेकर…भारिप पुन्हा सत्तेत…अध्यक्ष पदावर प्रतिभा भोजने तर उपाध्यक्षपदी सावित्रीताई...

अकोल्यात भाजप ठरली किंगमेकर…भारिप पुन्हा सत्तेत…अध्यक्ष पदावर प्रतिभा भोजने तर उपाध्यक्षपदी सावित्रीताई हीरासिंग राठोड

86
0

कुशल भगत

अकोला , दि. १८ :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर गेल्या 20 वर्षे पासून अखंडीत भारिप चाच अध्यक्ष राहिला आहे आणि आताही भारिप बहुजन महासंघ हा सत्तेच्या अगदी जवळच आहे एकूण ५३ सदस्य संख्या असलेल्या अकोला जी प मध्ये भारिप २३ आणि स्व पक्षाचे २ सदस्य विजयी झाले आहेत.

त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ २ सदस्यांची गरज असतांनाच भारिप ला सत्तेच्या दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी यांनी मोट बांधली असली तरीही राज्यात शिवसेना आणि भाजप ची युती तुटली असल्याने अकोल्यात ही जि. प. साठी ही युती नसल्याने भाजपा ने तटस्थ भूमिका घेत मतदान सुरु असताना सभागृहातून बाहेर पडल्याने बहू मतात असलेल्या भारिप ने जि.प.च्या अध्यक्ष पदावर आपला दावा कायम केला आहे यासाठी भाजप ही किंग मेकर बनली आहे.

Unlimited Reseller Hosting