Home विदर्भ रस्ता सुरक्षा सप्ताहाचा रॅली द्वारे समारोप, विविध उपक्रम व धडक कार्यवाही ने...

रस्ता सुरक्षा सप्ताहाचा रॅली द्वारे समारोप, विविध उपक्रम व धडक कार्यवाही ने सप्ताहाची सांगता

125

कुशल भगत

अकोट , दि. १८:- रस्ता अपघातात घट व्हावी ह्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशा नुसार व पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे मार्गदर्शना खाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिनांक 11।1।20 ते 17।1।20 पावेतो रास्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला ह्या अंतर्गत सप्ताह भर विविध उपक्रम व धडक मोहीम राबविण्यात आल्या, ज्या मध्ये विद्यार्थ्यांची रॅली, वेगाने वाहन चालविणारे, वाहन चालविताना मोबाईल वर बोलणारे, ट्रिपल सीट दुचाकी चालविणारे, दारू पिऊन वाहन चालविणारे , अश्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये दंड वसूल करण्यात आला.

त्याच बरोबर शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना रस्ते अपघात कमी करण्या साठी काय काळजी घेणे आवश्यक आहे ह्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले व त्यांना ह्या अनुषणगाने शपथ देण्यात आली, आम नागरिक , ऑटो चालक ह्यांची चौका चौकात कॉर्नर मीटिंग घेण्यात आली व रस्ता सुरक्षा संभधाने तयार करण्यात आलेले माहिती पत्रक वाटण्यात आले, स्कुल बस चालक, पोलीस वाहन चालक, वाहतूक कर्मचारी ह्यांचे नेत्र चिकित्सा शिबीर घेण्यात आले, बैलगाडी, ट्रॅक्टर, ऑटो ह्यांना अपघात टाळण्या साठी रेफलेक्टर लावण्यात आले असे विविध उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतल्या नंतर आज दिनांक 17।1।20 रोजी NCC व RSP च्या मुला मुलींची समारोपीय रॅली काढण्यात आली, सदर रॅली शहर वाहतूक शाखेच्या कार्यलयातून सुरू करण्यात आली, सदर रॅली ला पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली, नेहरू पार्क, हुतात्मा चौक मार्गे जेल चौक व परत अशी रॅली काढल्या नंतर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांना शपथ दिली व माहिती पत्रक वाटण्यात आले.

सदर रॅली मध्ये न्यू इंग्लिश स्कुल, बी आर पाटील विद्यालय, ज्योती विद्यालय, कोठारी कॉन्व्हेंट ह्या विद्यालयातील NCC व RSP चे 250 चे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक न्यू इंग्लिश स्कुल चे श्रीकांत रत्नपारखी, थोटे, ज्योती विद्यालय गाडे, डी आर पाटील विद्यालयाचे नांदूरकर उपस्थित होते.