Home विदर्भ घर जळालेल्या कुटूंबाला तळेगांव युवक काँग्रेसची अनोखी भेट

घर जळालेल्या कुटूंबाला तळेगांव युवक काँग्रेसची अनोखी भेट

497

गृहोपयोगी वस्तू सह कपड्यांची भेट

 

रवींद्र साखरे – तळेगांव शा पंत

वर्धा  :- येथील काकडदरा मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आणि या आगीमध्ये या कुटूंबाचे सर्वस्व स्वाहा झाले होते. यामध्ये घरातील प्रत्येक वस्तू जळून खाक झाल्यावर तळेगांव मधील काही समाजसेवक मान्यवरांनी या कुटूंबाची तात्काळ भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला होता. यामध्ये त्यांना सर्व गृहपयोगी वस्तू तसेच एका प्रतिष्ठित व्यक्तीने घर उभारण्याची मोठी मदत केली होती. आता यामध्ये स्थानिक युवक काँग्रेसने सुद्धा पुढाकार घेऊन त्यांना घरी जात घरात लागणाऱ्या सर्व गृहपयोगी वस्तू व किराणा भेट दिल्या. यामध्ये मधुसुदन नागपुरे, विनोद खोपे, अतुल वानखडे,पुंडलिक टरके, सुनील मोहेंकर यांनी आज सकाळीच या पीडित कुटूंबाचे घर गाठून या कुटूंबाला घरातील गरजू वस्तू भेट दिल्या यावेळी घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसून येत होते. यामध्ये भर म्हणून तळेगांव येथील समाजसेवक व काँग्रेस चे कार्यकर्ते सुनील मोहेंकर यांनी या कुटूंबाला कपडे देण्याचा मानस करत या कुटूंबाला कपडे देऊन एक छोटस समाजकार्य करण्याचा माझा मानस असल्याचे सांगितले.