Home विदर्भ ग्रामीण भागात कोरोना नियमाचे उल्लघन झाल्यास अधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल

ग्रामीण भागात कोरोना नियमाचे उल्लघन झाल्यास अधिका-यांना जबाबदार धरण्यात येईल

412
0

ईकबाल शेख

वर्धा, ग्राम स्तरीय अधिकारी, मंडळ अधिकारी , तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणतेही सार्वजनिक धार्मिक, सांस्कृतिक, राजकिय कार्यक्रम होणार नाहीत त्याशिवाय लग्न, समारंभ व अत्यंविधी यासारख्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त उपस्थितांची संख्या असणार नाही व कोरोना नियमांचे पालन होईल याची खात्री करुन व्यक्तीश: दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहे. असे असतांना सुध्दा ग्रामीण भागात लग्न समारंभ व ईतर विधी कार्यक्रामात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. अशा कार्यक्रमावर ग्राम स्तरीय अधिकारी, मंडळ अधिकारी , तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व त्यांचे कार्यालय प्रमुख, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरिक्षक यांना कोविड नियमांचे उल्लघन होत असतांना जाणिव पुर्वक दुर्लक्ष केल्यास जबाबदार ठरविण्यात येईल अशा सूचना उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिल्यात.

सध्या जिल्हयात कोरोना बाधिताची संख्या वाढत आहे. यासाठी जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्याशिवाय हॉटेल, रेस्टारंट, लग्न समारंभ इत्यादी ठिकाणी 50 पेक्षा अधिक व्यक्तींना कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवाणगी नाही. असे असतांना सुध्दा मोठया प्रमाणात कार्यक्रमात गर्दी होत आहे त्यामुळे ग्राम स्तरीय अधिका-यांना त्यांच्या क्षेत्रात कोरोना नियमाचे पालन न करण्या-यांवर दुर्लक्ष करु नये अशा सूचना दिलेल्या आहेत.