Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात तीन मृत्युसह 346 पॉझेटिव्ह तर  224 जण कोरोनामुक्त

यवतमाळ जिल्ह्यात तीन मृत्युसह 346 पॉझेटिव्ह तर  224 जण कोरोनामुक्त

202
0

 

          यवतमाळ, दि. 13 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 346 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 224 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 80  पुरुष आणि 72 वर्षीय महिला तसेच दिग्रस येथील 70 वर्षीय पुरुष आहे. तसेच पॉझेटिव्ह आलेल्या 346 जणांमध्ये 198 पुरुष आणि 148 महिला आहेत. यात यवतमाळातील 90, पुसद 70, महागाव 64, उमरखेड 37, दिग्रस 22, पांढरकवडा 17, दारव्हा 14, बाभुळगाव 5, घाटंजी 6, मारेगाव 3, नेर 4, राळेगाव 8, वणी 5 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.

            शनिवारी एकूण 2668 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 346 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2322 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2477 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 21265 झाली आहे. 24 तासात 224 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 18287 आहे. तर जिल्ह्यात एकूण 501 मृत्युची नोंद आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 182435 नमुने पाठविले असून यापैकी 181248 प्राप्त तर 1187 अप्राप्त आहेत. तसेच 159983 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.