Home मुंबई पत्नीने पतीच्या पोटात धारदार चाकू खुपसून केली निर्घृण हत्या ,

पत्नीने पतीच्या पोटात धारदार चाकू खुपसून केली निर्घृण हत्या ,

497
0

 

खूनी पत्नीस अटक

अमीन शाह ,

संपूर्ण देशात महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . मात्र याच महिला दिनाच्या दिवशी विरारमध्ये पत्नीने पतीच्या पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. घरगुती कारणावरून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात आरोपी पत्नीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत
नेहा पवार (वय 29) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. तर लोकेश जगदीश पवार (वय 30) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. या दोघांचा प्रेमविवाह झालेला असून त्यांना एक 8 वर्षांचा मुलगाही आहे. ते विरार पूर्व मकवाना कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील जीवदानी अपार्टमेंटमध्ये राहत होते , पहाटे साडेतीनच्या सुमारास पती कामावरून घरी आल्यानंतर या दोघात घरगुती कारणावरून वाद झाले. याच वादातून पत्नीने चक्क धारदार चाकू पतीच्या पोटात खुपसून त्याची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना विरार पोलिसांना कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बगाडे, पोलीस उपायुक्त प्रशांत वागुंडे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, आरोपी पत्नीलाही आपल्या ताब्यात घेतले.
पोलिसांनी पत्नीची पोलीस ठाण्यात कसून चौकशी केली असता घरगुती कारणावरून ही हत्या केली असल्याचे पत्नीने प्राथमिक पोलीस तपासात कबुल केले. यावरून विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन तिला बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, महिला दिनाच्या दिवशीच आरोपी महिलेला वसई न्यायालयात हजर केले असता तिला 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस तपास अधिकाऱ्यांनी दिली