Home मराठवाडा ट्रक ऐपे रिक्षा चा भीषण अपघात एकाच कुटुंबातील पाच ठार ,

ट्रक ऐपे रिक्षा चा भीषण अपघात एकाच कुटुंबातील पाच ठार ,

61
0

 

 

 

पठाण कुटुंबियांवर काळाचा घाला ,

अपघातानंतर आठ किलोमीटरवर जाऊन ट्रक उलटला

सात जण गंभीर जखमी

शेख ताहेर

बीड ,

भरधाव ट्रकने अॅपे रिक्षाला धडक देऊन पळ काढला . आठ किमी अंतरावर जाऊन ट्रक एका तलावाजवळ उलटला . या अपघातात ॲपेतील पाच जण ठार झाले असून सात ते आठ जण जखमी झाले . रविवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान पांगर बावडी परिसरात हा भीषण अपघात झाला . बीड शहराजवळील तेलगाव रोडवरील पांगर बावडी परिसरात वडवणीहून बीडकडे येणाऱ्या अॅपे रिक्षाला बीडहून वडवणीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरासमोर धडक दिली . अपघात एवढा भीषण होता की रिक्षा रस्त्याच्या कडेला गेला . रिक्षाचा अपघातात अक्षरशः चुराडा झाला . रिक्षात १० ते १२ जण होते . अपघाताची माहिती मिळताच आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पाठवून रुग्णाना स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले .एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ मृतांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे . बीड शहरातील पठाण कुटुंबावर काळाने घाला घातला . मदिना अफजल पठाण ( ३० ) , तबस्सुम अकबर पठाण ( ४० ) , रेहान अफजल पठाण ( १० ) , तमन्ना अकबर पठाण ( ८ ) , सारा सत्तार पठाण ( ४० ) यांचा मृतांमध्ये समावेश आहे . सर्वांचा जागीच मृत्यू झाला .