Home विदर्भ भांबोरा सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बोढाले विराजमान

भांबोरा सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर बोढाले विराजमान

297
0

रिक्त जागेवर सर्वानुमते निवड


यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील राजकीय दृष्ट्या तालुक्यासह जिल्हयात परिचित असलेल्या भांबोरा वि. वी. कार्यकारी सोसायटी चे अध्यक्ष पद रिक्त झाल्याने येथे नविन अधक्ष्याची निवड करण्यात आली यात ज्ञानेश्वर बोढाले सर्वानुमते विराजमान झाले.

कारेगाव, अंजी (नाईक), भांबोरा असे तीन गावे मिळून असलेल्या सोसायटीचे अध्यक्ष पद काही दिवसापूर्वी रिक्त झाले होते. त्याकरिता दिनांक ७ मार्च रविवारला येथिल अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली यात ज्ञानेश्वर बोढाले हे अविरोध निवडून आले. बिनविरोध निवडीकरिता सोसायटीचे संचालक सुदाश लीहितकर, मनोज जाधव, सचिन पवार, सखुबाई बबन पवार, सकरीबाई शिवलाल राठोड यांनी आपल्या पॅनल चा अध्यक्ष व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले. या अध्यक्ष निवडीचे श्रेय माजी पंचायत समिती सदस्य सदस्य सहदेव राठोड काँग्रेस चे ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार यांना दिले असून यावेळी मधुकर राऊत कारेगाव, संतोष उमरेड, वसंता कुंभेकार, दिपलाजी जाधव, भारत राठोड, रामदास राठोड दुलसिंग राठोड, वसंता काळे यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्ष यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपली निवड ही बिनविरोध असून आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहू असे मनोदय नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर बोढाले यांनी व्यक्त केले.