Home जळगाव कुसूंबा येथे असलेल्या पाझर तलावाच्या नाल्यावर नवीन पुल बांधण्याची मागणी,पुल न बांधल्यास...

कुसूंबा येथे असलेल्या पाझर तलावाच्या नाल्यावर नवीन पुल बांधण्याची मागणी,पुल न बांधल्यास निवडणुकीवर गावकरी टाकणार बहिष्कार..

536
0

कुसूंबा ता रावेर (हमीद तडवी) – तालुक्यातील कुसूंबा बुद्रुक आणि कुसूंबा खुर्द हे सातपुडा पायथ्याशी वसलेले गाव म्हणुन परिचित आहे.

या गावाच्या उत्तरेस सातपुडा जंगलाच्या पायथ्याशी पांझरतलाव आहे,हा पाझरतलाव पावसाळ्यात सातपुडा जंगलातुन वाहत आलेले नद्या खोऱ्यांचे पाणी हे कुसूंबा येथील| पाझर तलावात जमा होते आणि लहान पाझर तलाव असल्याने कारणाने हा तलाव लगेच तुडूंब भरुन ओव्हरफ्लो होतो,आणि ह्या ओव्हरफ्लो पाण्याचे रुपांतर पुरात होऊन हे पुराचे पाणी कुसूंबा बुद्रुक आणि कुसूंबा खुर्द ह्या दोन्ही गावांना जोडणाऱ्या नाल्यात जाते या नाल्यात गुरे ढोरे,शाळेकरी लहान मुले जीवीतहानीला कारणीभुत ठरत असल्याचे चिञ हे पावसाळ्यात पाहायला मिळते,आता सद्यास्थितीत उन्हाळा असल्याने या पुलाजवळुन रहदारीला अडथळा नाही,परंतु ३ महिन्यानंतर पावसाळ्याला सुरवात होताच या दोन्ही गावांच्या मध्यभागी असलेला पुल पुराच्या पाण्यामुळे केव्हाही जीवीतहानीला कारणीभुत ठरु शकतो,जेणेकरुन पावसाळा सुरु होण्याआधीच या कुसूंबा बु! आणि कुसूंबा खुर्द च्या मध्यभागी असलेल्या दोन्ही गावांना जोडणारा पुल तात्काळ नव्याने मोठा पुल बांधण्यात यावा अशी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांकडुन मागणी जोर धरत आहे.या पाझर तलावाच्या नाल्यावरील पुलाजवळ अनेक वर्षापासुन गुरे ढोरांची जीवीतहानी झालेली आहे,माञ येणाऱ्या पावसाळ्यात जीवीतहानी होऊ नये ,याकडे संबधित आमदार,खासदार,बांधकाम अधिकारी,मंञी यांनी या गंभीर अपघातांच्या पुलाकडे गंभीर विचार करुन गांभीर्याने लक्ष द्यावे अशी रास्त स्वरुपाची मागणी कुसूंबा येथील गावकऱ्यांकडुन करण्यात आली आहे,जर या पुलाकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या निवडणुकीवर गावकरी मिळुन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील संबधित आमदार,खासदार,संबधित अधिकारी ,मंञी यांना या प्रसिद्धी पञकाद्वारे इशारा देण्यात आला आहे.