Home मराठवाडा जालना जिल्ह्यात चोरून गांजा विकणारे महाभाग मोकाट ?….तर गांजाची शेती करणारा शेतकरी...

जालना जिल्ह्यात चोरून गांजा विकणारे महाभाग मोकाट ?….तर गांजाची शेती करणारा शेतकरी गजाआड..!!.

628

लक्ष्मण बिलोर

जालना –  जिल्ह्याच्या शहरीभागासह ग्रामीण भागात गांजाची चोरून, लपून , चोरट्या मार्गाने, बिनबोभाट विक्री होत आहे हि बाब लपून राहिलेली नसून गांजाची शेती करणारा शेतकरी मात्र मोठा गुन्हेगार ठरवून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे,

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथे गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातून २४लाख रुपयांची झाडे जप्त केली आहेत, बदनापूर पोलीस आणि गुन्हे शाखेची संयुक्त मोठी कारवाई समजली जात आहे.

जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात अफू (गांजाची) शेती करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्या मार्फत लागल्याने सापळा रचून रात्री उशिरा बदनापूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक चनेगाव शिवारात गेल्याने तेथे गांजाची (अफू) झाडे एका शेतात आढळून आली, ही गांजाची शेती जवळपास एक ते दीड एकरात लावल्याचे समजते.

 

 

 

 

९६ किलो २०० ग्राम वजनाची आणि २४ लाख ,पाचशे रुपयाची ही गांजाची झाडे जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, नायब तहसिलदार संजय शिंदे,दुर्गेश राजपूत, बदनापूर चे पोलीस निरीक्षक मारोती खेडकर, फुलचंद हजारे, किशोर जाधव, कृष्णा तेलांग्रे, प्रशांत लोखंडे, रवी जाधव, ए एस आय शेख इब्राहिम,आय जी शेख, शिवानंद काळूसे,विष्णू बुणगे, रणजित मोरे, आशिष दासार आदींनी पार पाडली या प्रकरणी आरोपी अटक असून पुढील तपास ए पी आय एन एन उबाळे करीत आहे , विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात परराज्यातून छूप्या मार्गाने गांजाची तस्करी होत असून पोलिस या गुन्हेगारांना शोधून कारवाई करणार काय ? असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे. आरोपी निवृत्ती गणेश शेवाळे रा चनेगाव ८क ,१७ क अमली औषध द्रावय मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.