Home विदर्भ विदर्भातील २१ पावन मृदा पंतप्रधानांना देनार – शैलेश अग्रवाल

विदर्भातील २१ पावन मृदा पंतप्रधानांना देनार – शैलेश अग्रवाल

102
0

ईकबाल शेख

वर्धा  – “मिट्टी की सौगंध देश नही बिकने दूंगा” या निवडनूक काळातील गर्जनेची आठवन प्रधानमंत्री मोदी यांना करून देन्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून काळे कायदे रद्द करन्यासाठी पवित्र मातीची गळ घालण्यासाठी शैलेश अग्रवाल यांच्यासह शेतकरी प्रधानमंत्री निवासाकरीता रवाना होणार आहेत.

राष्ट्रीय कीसान काॅंग्रेसचे अध्यक्ष सुरेन्द्र सोलंकी व शेतकरी आरक्षणाचे प्रनेते शैलेश अग्रवाल यांच्या नेतृत्वात शेतकरी या २१ पून्य स्थळांवरून नेलेल्या मातीसह एकून १०१ गावांची माती प्रधानमंत्री मोदी यांना देणार आहेत.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र महात्मा गांधींची कर्मभूमी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम, विनोबाजींचे पवनार, स्वात्यंत्रता संग्रामातिल शहीदांची ऐतिहासिक पृष्ठभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आष्टी, वरूड तालुक्यातील बेनोडा, धामणगाव तालुक्यातील भिकाजी महाराजांचे आष्टा, राष्ट्रसंतांची पंढरी मोझरी, रुख्मिनीचे माहेर कौडन्यपूर, समुद्रपूर तालुक्यांतील सामाजिक ऐक्याची पवित्रभूमी गिरड व आर्वीचे तेलंगराय देवस्थान, हिंगणघाट तालुक्यांतील नानाजी महाराजांची कापसी, भोजाजी महाराजांचे आजनसरा, नगाजी महाराजांची पारडी, केजाजी महाराजांचे घोराड, महात्मा गांधींनी हरिजनांसाठी सर्वप्रथम उघडले ते लक्ष्मीनारायण मंदीर, गोंड राजांची भूमी चंद्रपुर, दिक्षाभूमी नागपूर, गाडगेबाबांची पूण्यभूमी रूनमोचन, प्रभू रामचंद्रांची भूमी रामटेक, वर्धा नदिच्या काठाची, संत लहानुजी महाराजांचे टाकरखेडा व संत सत्यदेव बाबांचे भिष्णुर या पुण्य स्थळांची माती घेवून आज दिनांक ६ ला आंदोलक दिल्लीसाठी रवाना होत आहेत.