Home नांदेड दलित,अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकास कुंटुर पोलिसांनी केले तत्काळ जेरबंद –...

दलित,अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकास कुंटुर पोलिसांनी केले तत्काळ जेरबंद – दोन दिवसांची पोलीस कोठडी

705

राजेश एन भांगे

नायगाव तालुक्यातील देगाव येथे शिक्षक पेशला काळिमा फासणारी घटना असून.येथील पूज्य साने गुरुजी विद्यालयातील शिक्षकाने मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी

शिक्षक” कुंटूर पोलीसांच्या जाळ्यात शंकरनगर येथील विद्यालयातील घटना कांही महिन्यापूर्वी घडली असतानाच अजूनही अल्पवयीन मुलींची छेडछाड व बलात्कार प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहेत

आता नायगाव तालुक्यातील मौ.देगाव येथील पुज्य साने गुरुजी विद्यालयातील शिक्षक बापुराव श्रीपती मोरे या शिक्षकांने दि. २ मार्च २०२१ रोजी आपल्याच शाळेतील मागास वर्गीय अल्पवयीन एका दलीत मुलीसोबत अश्लिल भाषेत बोलत छेड – छाड केल्या प्रकरणी कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून.
पोलीसांनी त्या शिक्षकास अटक केली आहे.
एकीकडे देगाव येथील शाळेचे नाव पूज्य साने गुरुजी विद्यालय असे महान व्यक्तींचे नाव असताना सुद्धा त्याच शाळेतील शिक्षक बापुराव मोरे यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्याच शाळेतील नवव्या वर्गात शिकणाऱ्या मागासवर्गीय अल्पवयीन पीडित मुलगी मातंग समाजाची आहे हे माहीत असताना देखील मोरे या शिक्षकाने वाईट उद्देशाने अल्पवयीन पीडित मुलीजवळ जाऊन नेहमी बाजूला बसून तिच्या पाठीवरून हात फिरवून तिच्या हाताला चिमट्या घेऊन त्याच्या तिच्या सोबत अश्लील भाषेत मोबाईल वरून वेळो वेळी बोलताना तुला दहावीत पास करण्याची मी हमी देतो, असे बोलून तिला जवळीक करण्याचा करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच रात्री – बेरात्री फोन करून बोलने चालू होते असे असताना सदर विद्यार्थीने त्यांचे बोलणे टाळत असले तरी तो वारंवार फोन करीत असल्याचे तिने आपल्या वडिलांना सदर शिक्षका विषयी बोलत असलेली भाषा सांगितल्या नंतर वडील व तिच्या नातेवाईकांनी रितसर माहिती
दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच सदर शिक्षकाला शाळेतून आपल्या ताब्यात घेतले आहे सदर बातमी हळूहळू सर्वत्र कळाल्या नंतर कुंटूर पोलीस ठाण्यामध्ये विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते हजर झाले होते.
सदर प्रकरणी पीडित मातंग समाजाच्या मुलीच्या फिर्यादीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली व सपोनी करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली भदवी कलम ३५४ , १२ पॉस्को आई टी. अधिनियम ६५ , ३ (१) (w) (१) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमा नुसार कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तरी या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ हे करीत आहेत.