Home मुंबई विक्तू बाबा एक थोतांड, बौद्ध धम्म व आंबेडकरी विचाराशी गद्दारी.:- डॉ. राजन...

विक्तू बाबा एक थोतांड, बौद्ध धम्म व आंबेडकरी विचाराशी गद्दारी.:- डॉ. राजन माकणीकर

269

मुंबई दि (प्रतिनिधी) राज्यातील नागपुरात धम्मभूमीवर टाकळघाट येथे एक विहार आपले थोतांड व अंधश्रद्धा प्रस्थापित करत असून धम्म आणि आंबेडकरी विचारांशी विसंगती असून अश्या गद्दारांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे असल्याचे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी मांडले.

अंधश्रद्धा व कर्मकांड आणि थोतांड या गोष्टींना आंबेडकरी तत्वज्ञानात तसूभरही जागा नसुन अंधश्रद्धेस खतपाणी देणारे हे विक्तू बाबा नामक मनोरुग्णाचे मंदिर व विहारा सारखे बांधकाम असलेली इमारत तात्काळ तोडून टाकण्यात यावी, कारण या इमारती मधून बुद्ध व आंबेडकर विचारात भेसळ करवून धम्म व आंबेडकर विचार मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना गाफील करून समाजात अंधश्रद्धा रुजविण्याचे काम या मनोरुग्ण असलेल्या इमारतीतून होत आहे, हि इमारत व संस्थान लवकरात लवकर सरकारने ताब्यात घेऊन या इमारतीचा वापर गोर गरिबांच्या कल्याणासाठी किंवा निराधारांच्या आश्रयासाठी करावा. अशी मागणी पक्ष्याचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे.

सदर इमारत व संस्थेचे विस्वस्थ मंडळ बरखास्त करून समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करण्यात यावे. गाणी, भजन, आरती व अन्य साहित्य सर्व नष्ट करण्यात यावे व याचा मास्टर माईंड शोधावा व अश्या लोकांवर अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी व असे विकृतीकरण अजून कुठे कुठे होत आहे यावर आवाज उचलन्यासाठी आर.पी.आय डेमोक्रॅटिक कटिबद्ध असल्याचे ही डॉ. माकणीकर यांनी सांगितले.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात डॉ. राजन माकणीकर यांच्या अध्यक्षतेखाली, श्रावण गायकवाड, वसंत कांबले, विजय चव्हाण, हरिभाऊ कांबळे, वसंत लांमतुरे यांच्या सहभागातून एक शिष्टमंडल राज्यपालांशी भेट घेऊन हा प्रकार कायमचा बंद पाडून विज्ञानदिस्थित समाज घडवण्याचे कार्य करणार असल्याचेही डॉ. माकणीकर यांनी संगितले.

सदर प्रकार हा किळसवाणा आणि विज्ञानवादी जनतेला अंध श्रद्धेकडे नेणारा आहे, त्यामुळे सुजाण व जाणकार मंडळींनी या बोगस इमारती कडे न जाता हा प्रकार बंद होण्यासाठी आपापल्या परीने आंदोलन करावे, पूज्य बौद्ध भिक्षु गणांनि या प्रकरणात लक्ष घालावे असे मत डॉ. राजन माक्निकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे व्यक्त केले.