Home जळगाव एम आय एम पक्षाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत पदाधिकाऱ्यांनी...

एम आय एम पक्षाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत पदाधिकाऱ्यांनी मिठाई वाटली

209

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे आज एम. आय. एम. नशिराबाद शहर एम. आय. एम. पक्षाच्या वतीने पक्षाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ गफार कादरी यांच्या आदेशाने पक्षाचा वर्धापन दिना निमित्त एकमेकांना शुभेच्छा देत पदाधिकाऱ्यांनी मिठाई भरवत जल्लोष साजरा केला.

आॅल इंडिया मजलिस – ए – इत्तेहादुल मुस्लिमीन हा भारत देशामधील एक राजकीय पक्ष आहे. १९२६ साली स्थापन झालेल्या हया पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे असून त्याची विचारधारा सेक्युलर विचार धारेवर आधारित आहे. हैदराबाद लोकसभा मतदार संघावर १९८४ पासून सतत एम. आय. एम. चे वर्चस्व असून येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एम. आय. एम. पक्षप्रमुख आहेत.
या कार्यक्रमात शहर अध्यक्ष आसिफ शेख, शहर सचिव सलमान शेख, शहर उपसचिव रईस मण्यार, युवा अध्यक्ष इकबाल शेख, युवा उपाध्यक्ष अनिस शेख, महमूद बिल्डर, अफसर पेंटर, अफसर मिर्जा, आकीब शेख, शोएब शेख, मुजममिल मण्यार, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.