Home महत्वाची बातमी पोलिसांनी महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढुन नाचण्यास भाग पाडले ,

पोलिसांनी महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढुन नाचण्यास भाग पाडले ,

977

 

विधानसभेत गाजला प्रकरण ,

 

अमीन शाह

जळगावमधील एका महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचण्यास भाग पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे . यात पोलिसांवर सुद्धा आरोप केले जात आहेत . या घटनेचे पडसाद आज अधिवेशनात उमटले . भाजपा च्या चिखली च्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि याबाबत कारवाईची मागणी केली . यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर नियमाने कारवाई होईल , असे आश्वासन दिले . याबाबत अधिवेशनात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की , जळगावमधील वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे . घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे . या समितीचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होईल . जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरू आहे . व्हिडीओ आणि इतर सर्व माहिती एकत्र केला जात असून जबाबही नोंदवले जात आहेत . याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल
भाजपाच्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली . यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेऊ , असे म्हटले . यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल , असा थेट इशारा दिला . ‘ सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे . हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की , उद्या माझी बहीण , तुमची बहीण एवढे एक सेकंद नजरेत आणा . अशा पद्धतीने तुमच्या , माझ्या आई बहिणीला नग्न करुन , कपडे काढून नाचायला लावले जाते आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात . तुम्ही एका तासात चौकशी करतो . काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो , असे म्हणायला हवे . पण म्हणता नोंद घेतो , हे पाप फेडावे लागेल , ‘ असे टीकास्त्र मुनगंटीवार यांनी सोडले .

जळगावमधील एका सामाजिक कार्य करणाऱ्या टीमने हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणी आणि महिलांसोबत बातचीत केल्यावर हे प्रकरण समोर आल्याचा दावा केला . या प्रकरणाचा उलगडा मंगळवारी करत एनजीओकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती ,

जे व्हिडिओ व्हायरल झाले ते फक्त आरोप करताना महिलांचे आहेत . फक्त आरोप केले जात आहेत . अश्लील व्हिडिओ तर कुठेच नाही . फक्त आरोप करणारा व्हिडिओ आल्याने इतका गोंधळ उडाला . आमच्याकडे जो आरोप करतानाचा व्हिडिओ आहे , त्याला आधार मानत पुढील तपास करणे हे आमचे काम आहे आम्ही तपास करत आहोत लवकरच सत्य समोर येईल ,
पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे ,

पोलिसांनी केले शोषण ?

, घटना 1 मार्चची आहे . चौकशीच्या नावाखाली काही पोलिस आणि कर्मचारी हॉस्टेलमध्ये दाखल झाले . त्यांनी कथितरित्या तरुणींचे कपडे काढून डान्स करायला भाग पाडले . ज्या तरुणींनी याचा विरोध केला , त्यांना मारहाण झाली . याबाबत माहिती घेण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ते तेथे गेले , त्यांना आत जाऊ दिले नाही . यानंतर तरुणींनी खिडकीतून ओरडून घडलेला सर्व प्रकार सांगितला . ज्या वेळेस त्या तरुणी घडलेला सर्व प्रकार सांगत होत्या , तेव्हा हॉस्टेलचे कर्मचारी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते .