Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील ससाणी येथील सरपंच, उपसरपंच निवडणूकी दरम्यान दाखल गुन्हयातील २८ आरोपी...

घाटंजी तालुक्यातील ससाणी येथील सरपंच, उपसरपंच निवडणूकी दरम्यान दाखल गुन्हयातील २८ आरोपी अद्यापही फरार…!

282

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील ससाणी येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूकी दरम्यान घाटंजी पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील पांच आरोपी अटक असून यवतमाळ कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे, तर २८ संशयीत आरोपी अद्यापही फरार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. फरार आरोपी मध्ये जगदीश रोकडे, महादेव दगडे, राजु आडे, विलास राठोड, महेश दगडे, ज्ञानेश्वर सुरेश रोकडे, ज्ञानेश्वर शंकर रोकडे, संजय काळे, सतिष रोकडे, नरसिंग राठोड, बाळु राठोड, अनिल सुरपाम, बंधन सोनडवले, उमेश रोकडे, अमोल नांदे, ज्ञानेश्वर राउत, शंकर राउत, सुरेश जुनघरे, महादेव रोकडे, पृथ्वीराज कावळे, गणेश दगडे, ओमप्रकाश भोयर, वाल्मिक राउत, महेश गाउत्रे, पवन जेंगठे, सारंग दगडे, गजानन ऊर्फ बाल्या सुरपाम व पंकज आडे आदी अठ्ठावीस आरोपीचा समावेश आहे.
🔵 ग्रामपंचायत सदस्य दिलीप नगराळे, उमेश जुनघरे, एकनाथ देसाई, चेतन ढवळे व संदीप पोटे हे पांच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. या आरोपींना घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांनी अगोदर दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती, तर गुरुवारी त्यांना १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
🔵 घाटंजी तालुक्यातील ससाणी येथे सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक होती. सरपंच, उपसरपंच यांचे नामनिर्देशन पत्र भरतांना त्यावर सही नसल्या कारणावरुन चुक झाल्याचे लक्षात आल्यावर आपला उमेदवारी अर्ज रद्द होईल या भीतीने ग्रामपंचायत सदस्य दिलीप नगराळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याचे लोकांना सांगून भडकाविल्याने गावातील ३०/३३ लोकांचा जमाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर तयार झाला व बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला न जुमानता ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून निवडणूक अध्यासी अधिकारी लखन मेंडोले, ग्रामसेवक अमोल जंगमवार यांच्या ताब्यातील सरपंच, उपसरपंच निवडणूक प्रक्रियेचे कागदपत्रे, सभेचे ईतिवृत रजिष्टर, हजेरी रजिष्टर, सरपंच, उपसरपंचाचे नामनिर्देशन पत्रे, उमेदवारांना बजावलेली नोटीसची स्थळ प्रती, जिल्हाधिकारी यांची अधिसूचना व अध्यासी अधिकारी लखन मेंडोले यांचा सतरा हजार रुपयाचा रेडमी ८ प्रो कंपनीचा भ्रमणध्वनी ताब्यातुन चोरुन नेले. या वेळी ग्रामपंचायत कार्यालयात कर्मचारी किसन राठोड, निवडून आलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते. या वेळी पोलीस पाटील दुर्योधन आडे यांना सुद्धा वाचारणा करण्यात आली असता, त्यांनी गजानन उर्फ बाल्या सुरपाम सह पांच अनोळखी ईसम असल्याचे अध्यासी अधिकारी लखन मेंडोले यांना सांगितले.
🔵 त्यावरुन अध्यासी अधिकारी लखन मेंडोले यांनी २२ फेब्रुवारी रोजी घाटंजी पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल केला. त्यावरुन ग्रामपंचायत सदस्य दिलीप नगराळेसह 33 आरोपी विरुद्ध भादंवि 395, 353, 143, 147,149 सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 तसेच आणि दंड संहितेच्या 1860 चे कलम 188, 279, 270 व मुंबई पोलीस कायदा 135 कलमान्वये घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य दिलीप नगराळे सह पांच आरोपींना घाटंजी पोलीसांनी त्याच दिवशी अटक केली होती.
🔵 तथापि, ससाणी येथील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूकी दरम्यान आशीस भोयर गटातर्फे सरपंच पदासाठी रामाजी पोटे, तर उपसरपंच पदासाठी आशीष भोयर आणि विरोधी गटातर्फे सरपंच पदासाठी दिलीप नगराळे, तर उपसरपंच पदासाठी योगीता रोकडे यासह 5 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पुढील तपास घाटंजीचे ठाणेदार बबन कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक किशोर भुजाडे करीत आहे.