Home मराठवाडा जालना जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.देशपांडे

जालना जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.देशपांडे

182

जालना- लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.संजय मधुकर देशपांडे तर उपाध्यक्ष पदी अॅड.राजेंद्र श्रीरंग राऊत विजयी झाले. अॅड.संजय देशपांडे
२८८ मते घेऊन विजयी झाले.

तर अॅड.राजेंद्र राऊत हे २३७ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड.आनंद झा यांना ४८ तर अॅड. अनिरूद्ध घुले यांना ९८ मते मिळाली.प्रतिस्पर्धी अॅड. अनंता मस्के यांना १९७ मते मिळाली.जिल्हा वकिल संघाच्या सचिवपदी अॅड शारजा मिसर शेख यांनी २३४ मते घेऊन विजय संपादन केला तर त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड.महेश मते यांना ५१ मते ,अॅड.गणेश तौर यांना १४३ मते मिळाली.सह सचिवपदी अॅड.जगदीश मदन यांनी १६५ मते घेऊन विजय संपादन केला तर त्यांचे प्रतिस्पर्धी अॅड.अनिरूद्ध देशमुख १४४तर अॅड.शितल खांडेभराड यांना १२८ मते मिळाली,अशी माहिती अॅड.अरविंद मुरमे यांनी दिली.
निवडणूक समिती सदस्य म्हणून अॅड.वाल्मिक घुगे,अॅड.राहूल चव्हाण,अॅड.दशरथ शिराळे,अॅड.राजेंद्र सद्गुरे,अॅड.सुजित मोटे,अॅड गावंजी घोडे,अॅड गोपाल मोरे आदिंनी काम पाहिले.