Home महत्वाची बातमी तिकीट मशीन मध्ये बिघाड झाला अन , विपरितच घडला ,

तिकीट मशीन मध्ये बिघाड झाला अन , विपरितच घडला ,

628

 

दुःखदायक घटना ,

अमीन शाह ,

तिकीट मशीनमध्ये बिघाड आल्याने चुकीचे तिकीट दिल्या गेले आणि नेमके तेच तिकीट तपासणी पथकाच्या हाती लागले . त्यामुळे चार वर्षे प्रामाणिकपणे सेवा देऊनही आपल्यावर कार्यवाही होईल , सोयरे – धायरे , मित्र व एस . टी . महामंडळ परिवारात आपली नाहक बदनामी होईल या भीतीपोटी माहूर एस . टी . आगाराचे वाहक संजय संभाजी जानकर वय 55 रा.वाघी जि.नांदेड यांनी आज सकाळी 4 च्या सुमारास आगाराच्या आवारात उभ्या असलेल्या एस . टी.क्रमांक एम . एच . 20 बी.एल .4015 मध्ये गळ्याला फास लाऊन आत्महत्या केली . दरम्यान , त्यांनी तीन पानांची लिहिलेल्या नोटमुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले . बुधवारी वाहक संजय जानकर हे माहूर – नांदेड फेरीवर असताना त्यांनी महागांवच्या प्रवाशांकडून पैसे पूर्ण घेतले . मात्र , तिकीट धनोड्यापर्यंतचेच दिल्याची बाब एसटी महामंडळाच्या पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाली होती . याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती . यामुळे आता आपल्याला निलंबित केले जाईल , नातेवाईकात बदनामी होईल या भिती पोटी त्यांनी आत्महत्येच पाऊल उचलले . शुक्रवारी पहाटे सफाई कर्मचाऱ्याच्या निदर्शनास ही बाब उघडकीस आली . यावेळी वाहक जानकर यांचा दोरीने
लटकलेला मृतदेह दिसून आला . त्यांनी ही माहिती इतर कर्मचाऱ्यांना दिली . सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नामदेव रीठे यांनी घटनास्थळी भेट दिली . बीट जमादार विजय आडे , प्रकाश देशमुख यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे . मृत जानकर यांच्या खिशात चिट्ठी सापडली असल्याची माहिती आगार प्रमुख व्ही . टी.धुतमल यांनी दिली . नादुरुस्त तिकीट मशीन संजय जानकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची बाब त्यांनी लिहून ठेवलेल्या चार पानी पत्रातून उघड झाली आहे . राज्यातील अनेक आगारात तिकीट मशीन नादुरुस्त आहेत . याच नादुरुस्त तिकिट मशिनमुळे वाहक जाणकार यांना जीव गमवावा लागला या घटने मुळे सर्वत्र हळहळ वयकत केली जात आहे घटनेचा पुढील तपास पोलीस विभाग करीत आहे ,