Home महाराष्ट्र प्रेम प्रकरणातून जन्मास आलेल्या अवघ्या चार महिन्याच्या धनश्री ची आखेर झाली सुटका...

प्रेम प्रकरणातून जन्मास आलेल्या अवघ्या चार महिन्याच्या धनश्री ची आखेर झाली सुटका ,

338

 

अमीन शाह ,

सातव्या महिन्यात एका महिलेचा गर्भपात झाला परंतु तिने ही गोष्ट आपल्या पतीपासून लपवून ठेवली . त्यानंतर त्या महिलेने सुमारे चार महिन्यांच्या नवजात मुलीचे अपहरण केले आणि आपल्या पतीसमोर तिला आपली मुलगी असल्याचे सांगितले . याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी महिलेला अटक केली आहे . पोलिस नवजात बाळाच्या खऱ्या आई – वडिलांचा शोध घेत आहेत . पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी सांगितले की , अटक करण्यात आलेली महिला ही बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे राहणारी राणी शिवाजी यादव आहे . ते म्हणाले की राजेंद्र प्रभाकर नागपुरे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती . दरम्यान , महिलेने चौकशी दरम्यान सांगितले की ती बीडची रहिवासी आहे . कामामुळे ती पुण्यात एकटी राहायची . ती गर्भवती होती . अचानक तिचा गर्भपात झाला . यानंतर तिने याविषयी आपल्या सासरच्यांना माहिती दिली नाही . मग ती घरी गेल्यावर बाळाविषयी काय सांगावे असा ती विचार करु लागली . नंतर तिने योजना आखली आणि ज्या घरात नवजात बाळ आहे त्या घरात काम शोधले .
दरम्यान , राजेंद्र प्रभाकर नागपुरे यांनी पोलिसांना सांगितले होते की , राणी कामाच्या शोधात त्यांच्या घरी आली होती . काही दिवस काम केल्यावर राणी चार महिन्यांच्या धनश्रीला घेऊन पळून गेली . त्यानंतर त्यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली . यानंतर पोलिसांनी कारवाई दरम्यान सुमारे 100 सीसीटीव्ही फुटेज तपासले . आरोपी राणी पूर्वी जिथे राहत असे तेथे पोलिस पोहोचले असता ती बरेच दिवसांपासून येथे राहत नसल्याचे समजले . यानंतर पोलिसांनी तपास केला आणि त्या महिलेला अंबेजोगाईतील कुथार विहार येथून अटक केली . चार महिन्यांच्या धनश्रीची ही आहे कहाणी धनश्रीच्या जन्माची एक विचित्र कथाही आहे . धनश्रीचा जन्म एका प्रेम प्रकरणात खासगी वसतिगृहात झाला होता . जन्मानंतर धनश्रीच्या आई आणि वडिलांनी मुलीला राजेंद्र नागपुरे आणि त्यांची पत्नी यांच्याकडे सोपवले आणि त्यांनी तिची काळजी घ्यायला सुरुवात केली . मूळ पालकांनी धनश्रीची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी केले आहे .