Home विदर्भ ब्राह्मण वाडा शिवारात वाघीण व तिच्या पिल्लांची दहशत.

ब्राह्मण वाडा शिवारात वाघीण व तिच्या पिल्लांची दहशत.

212

 ईकबाल शेख

वर्धा –  वर्धा जिल्हा कारंजा घाडगे तालुक्यातील ब्राह्मणवाडा या जंगल व्याप्त गावामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून एक वाघीण व तिचे २ लहान पिल्लांनी दहशत पसरवलेली पासून यापूर्वी दोन गाईचे वासरू व एक मोठी गाय या वाघिणीने खाल्ले असून आज २५ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता ची दरम्यान ब्राह्मणवाडा येथील रवींद्र वामनराव काळे वय ४५ वर्ष हे शेतकरी आपल्या शेतात ओलीता करिता गेले असता तलावाच्या कॅनल ची पाणी आपल्या शेतामध्य फलटण याकरिता गेले असता वाघिणीच्या पिल्लाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला परंतु ते शेतकरी जोराने ओरडून जोराने धावू लागले तेवढ्यात आजुबाजुची शेतकरी एकत्र गोळा झाले तेव्हा कुठे त्यांचा पकडलेला फुल पॅन्ट वाघिणीच्या पिलाने सोडला त्यामुळे थोडक्यात ही दुर्घटना तळणी

या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून सतत वाघाची दहशत असते या वाघिणीने व तिच्या पिलानी तलावाच्या बाजूने वास्तव्य केल्याने त्या परिसरात शेतकऱ्यांनी जाणे सुद्धा बंद केलेले आहे काही शेतकरी जीव मुठीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशा दुर्घटना येथे घडत आहेत वनविभागाने वाघीण व तिच्या पिलांना कॅमेरा बंद करून तिला दुसऱ्या जंगलांमध्ये सोडण्याची व्यवस्था करावी अशी ब्राह्मणवाडा खैरवाडा मासोद चोपण पेपर वाडा या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.