Home मराठवाडा खुन्नस साथीदाराचा नव्हता बोलबाला,तरिही त्याने झोपेतच घातला घाला..!

खुन्नस साथीदाराचा नव्हता बोलबाला,तरिही त्याने झोपेतच घातला घाला..!

472
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

 एकाचच दुकानात काम करत असताना कामाच्या वाटणीवरून धुसफूस, कुरबुर करत नंतर त्याचे पर्यावसान खून करण्यात व्हावे हि अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समजली जात असून सदर घटनेमुळे जालना जिल्हा हादरून गेला आहे.

मयत

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील शहागड रोडवरील शिवतीर्थ मंगल कार्यालय ते पेट्रोल पंप दरम्यान रामहरि तुळशीराम सुरोसे रा.कृष्णनगर ,साडेगाव आणि संतोष बापुसिंग परदेशी रा.कडाआष्टी ता.जि.बीड या दोघांच्या मालकिची समर्थ बेकरी आहे.

आरोपी

या दुकानात अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील ज्ञानेश्वर बंडू शेडगे वय २४ वर्ष आणि सचीन पांडुसिंग परदेशी रा.सोनई, ता.नेवासा,जि.अहमदनगर हे दोघे तरूण कामावर होते या दोघांमध्ये कामाच्या वाटणीवरून सदा कुरबुर, धुसफूस सुरू असायची त्यांच्यातील वाद पराकोटीला पोहोचला आणि सचीनने ज्ञानेश्वरचा काटा काढायचा बेत आखला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे…२३ फेब्रुवारी मंगळवारी रोजी रात्री ज्ञानेश्वर शेडगे झोपेत असताना सचीन परदेशीने कुऱ्हाडी ने घाव घालून ज्ञानेश्वरचा खून केला आणि हेडफोन्स लावून मोबाईल फोन वरती पिक्चर पाहत बसला ….सचीनने स्वत:चा बचाव करण्यासाठी…बेकरी बाहेर येऊन आरडाओरड केली आणि कुणीतरी अज्ञात दोन व्यक्तींनी ज्ञानेश्वरचा खून केला आणि पळून गेली असल्याचे नाटक सचीनने केले,अशी प्राथमिक स्वरूपात घटनेची माहिती पोलिसांना कळताच गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ ,तीर्थपुरी पोलिस दुरक्षेत्र विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौसाळे, सहायक फौजदार श्रीधर खडेकर पोकाॅ.भगवान शिंदे, योगेश दाभाडे,माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली,श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ञ राहुल शेजुळ यांनी घटनास्थळी निरिक्षण करत महत्त्वाचे धागेदोरे हस्तगत केले.पोलिस निरीक्षक शिवकुमार बल्लाळ यांनी संशयित आरोपी सचीन परदेशीच्या देहबोली हालचाली टिपल्या आणि आरोपीला बोलते गेले सचीनने गुन्ह्याची कबुली दिली.गोंदी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून बुधवारी त्याला अंबड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, कामाच्या वाटणीवरून आलेला ताण असह्य झाला म्हणून आपण ज्ञानेश्वरचा खून केला असल्याची कबुली आरोपीने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.या खून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कौसाळे करत आहेत.