Home विदर्भ घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळुन खाक

घराला लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळुन खाक

242

ईकबाल शेख

वर्धा / तळेगांव (शा.पं.) : – येथील काकडदरा वार्ड क्रं. ५ भागातील रहिवासी जानराव गुळभेले यांच्या घराला बुधवारला ५ वाजताचे सुमारास अचानक आग लागली यात घरातील संपुर्ण साहित्य जळुन कोळसा झाल्याने गुळभेले यांचे ६० हजाराचे नुकसान झाले आहे. हि आग कशामुळे लागली त्याचे कारण समजु शकले नाही.
गुळभेले यांचे घरातील संपुर्ण सदस्य हे नेहमीप्रमाणे शेतात शेतमजुरी करीता गेले होते अशातच सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान गुळभेले यांचे घर जळाल्याचे परिसरातील नागरीकांचे लक्षात आले आग लागल्याचे लक्षात येताच नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले परंतु तोपर्यंत घरासह संसारोपयोगी साहित्य जळुन खाक झाल्याने गुळभेले यांचे ६० हजाराचे रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.घटनेची माहिती मिळताच तलाठी किसन काैरती यांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला. जेमतेम परिस्थिती असलेल्या गुळभेले कुटूंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.