Home विदर्भ कोरोणा नियंत्रणासाठी टाळेबंदीची गरज नाही जिल्हाधिकाऱ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला…!

कोरोणा नियंत्रणासाठी टाळेबंदीची गरज नाही जिल्हाधिकाऱ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला…!

163

योगेश काबंळे

वर्धा –  जिल्ह्याातील करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या पथकाने आज(मंगळवार) सेवाग्रामच्या कस्तुरबा रूग्णालयास भेट देऊन वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला. यावेळी समुदाय आरोग्यविज्ञान शाखेचे तज्ज्ञ डॉ.सुबोध गुप्ता यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटे संदर्भात केलेल्या अभ्यासाचे सादरीकरण यावेळी केले व सल्लेही दिले. यामध्ये टाळेबंदी करण्याची गरज नाही. मात्र लोकांनी गर्दी टाळायला हवी. असे सांगण्यात आले.
तसेच, लग्न समारंभात जेवणाचे कार्यक्रम असु नये, संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक असु नये. कारण त्यामुळे लोक घाबरून पुन्हा चाचणी करण्याचे टाळतील. परिणामी चाचण्यांची संख्या कमी होईल आणि कोविड रूग्ण निदर्शनास येणार नाहीत, असे डॉ.गुप्ता यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे याच रूग्णालयाचे संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी टाळेबंदी हा उपायच नसल्याचे जाहीरपणे यापूर्वीच सांगितले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या पाहणी दौऱ्यात शल्यचिकीत्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे व अन्य सहभागी झाले होते.
या रूग्णालयात २०० ऑक्सिजन बेड २४ विशेष दक्षता कक्ष उपलब्ध आहेत. रूग्ण वाढल्यास ३०० बेडपर्यंत सोय होऊ शकत असल्याचे संस्थेचे सचिव डॉ.गर्ग यांनी नमूद केले. सावंगीच्या शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रूग्णालयात रूग्णांची सद्यस्थिती बघण्यासाठी सीसीटीव्ही आहेत. त्या माध्यमातून रूग्णांच्या आप्तांना माहिती मिळते. या व्यवस्थेबद्दल जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी आपल्या भेटीत समाधान व्यक्त केले. रूग्णाच्या संपर्कातील आणि अतीजोखमीच्या रूग्णांचा पाठपुरावा तसेच मृत्यूंचे अंकेक्षण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. संस्थेचे कुलगुरू डॉ.राजीव बोरले यांनी उपायांची माहिती दिली.