Home विदर्भ अर्ज बाद झाल्याने सरपंच निवडीचे साहित्य लंपास , “घाटंजी तालुक्यातील ससानी येथिल...

अर्ज बाद झाल्याने सरपंच निवडीचे साहित्य लंपास , “घाटंजी तालुक्यातील ससानी येथिल प्रकार”

165
0

अध्यासी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून घाटंजी पो. स्टे. त ३३ जनावर विविध गुन्हे दाखल…!

यवतमाळ / घाटंजी‌-  जानेवारी महिन्यात पार पडलेल्या ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया २२ जानेवारी रोजी आयोजित होती. यात घाटंजी तालुक्यातील ससानी येथे ही प्रक्रिया राबविताना सरपंच व उपसरपंच यांचे अर्ज बाद झाल्याचे लक्षात येताच चक्क निवडणूक साहित्यासह निवडणूक अध्यासि अधिकाऱ्याचे मोबाईल लंपास करून निवडणूक केंद्रात गोधळ निर्माण झाला असल्याने येथिल ३३ नागरिकांवर घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सात सदस्यीय असलेल्या सासनी ग्राम पंचायत मध्ये सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रिया ११ वाजता सुरू झाली. या प्रक्रियेत ५ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सरपंच पदाचे उमेदवार दिलीप पुंडलिक नगराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात त्यांनी आपल्या अर्जावर सही केले नसल्याची कल्पना आली व आता आपले नामनिर्देशन खारीज होणार हे लक्षात येताच त्यांनी परत सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी योगिता रोकडे यांचा अर्ज १२:२ वाजता सादर केला. पहिल्यांदा अर्जावर सही नसणे तर दुसरा अर्ज वेळेवर सादर न करणे यात आपण पदा पासून मुकणार ही कल्पना मनात येताच अध्याशी निवडणूक अधिकाऱ्यालाच दोषी ठेवत त्यांच्याशी हुज्जत घातली. ही बाब येथेच न थांबता आपल्या पॅनलच्या नागरिकांना बोलावून गोंधळ घालीत चक्क निवडणूक साहित्य व निवडणूक अधिकाऱ्याचे मोबाईल लंपास करून निवडणूक कार्यात वत्यय निर्माण केल्या वरून संबधित अधिकाऱ्याने तहसिलदार यांना सदर घटनेची माहिती दिली यावरून ते पोलिस पथकासह ससानी येथे दाखल होवून येथिल परिस्थिती नियंत्रणात आणली. आणि परिस्थितीचे गांभीर्य जाणून येथिल निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले. येथे घडलेल्या घटनेची लेखी तक्रार अध्याशी निवडणूक अधिकारी लखन शांतारामजी मेंडोले यांनी घाटंजी पोलिस स्टेशन ला दिल्यावरून भादवी,३९५,३५३,१४३,१४०,१४९,१८८,२७९,२७०,१३५,७ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार तराले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे करीत आहे.