Home नांदेड मुखेड तालुक्यात गुटखा विक्रेत्याच्या विरोधात मोठी कारवाई – ४ लाख ७६ हजार...

मुखेड तालुक्यात गुटखा विक्रेत्याच्या विरोधात मोठी कारवाई – ४ लाख ७६ हजार ५०० रुपयाचा गुटखा जप्त

491

राजेश एन भांगे

सुमारे ४ लाख ७६ हजार ५०० रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला असून नव्या पोलिस निरीक्षकाची गुटखा विक्रेत्या विरोधात धाडसी कारवाई.
तब्बल वर्ष भरा नंतर झालेल्या पोलिसी कारवाईने अवैध धांदेवल्यांचे धाबे दणाणले.
पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे व पो. उ. नि.अनिता इतटूबोने यांची संयुक्त कारवाई केली असून गुटखा विक्रेत्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली.

मुखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध मार्गाने अवैधरीत्या गुटखा विक्री सुरु असल्याची कूनकून पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांना लागताच मुखेडचे नवे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे व महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता इटूबोने यांनी धाड टाकून मौ. जांब येथे दि. २० फेब्रु. रोजी राऊतवाड कॉम्प्लेक्स मधील यश अंडा सेंटर व कन्फेक्श्नरी दुकानात दोन व्यक्तीसह अवैध रित्या ४ लाख ७६ हजार ५०० रुपयाचा गुटखा ताब्यात घेतले.

त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.
मागील काळात मुखेड शहर व परिसरात अवैध मार्गाचे अवैध धंदे बिनदिक्कत पने सुरु होते त्यावर कुठल्याही प्रकारची तत्कालीन पोलीस निरीक्षकाने कारवाई न करता अवैध धंदे वाल्या सोबत हात मिळवणी करून आपले चांगभले करून घेण्यात धन्यता मानली असल्याचेच चित्र होते.
पण पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी “पदभार घेताच, अवैध धंद्या विरोधात धाडी सत्र चालवल्या मुळे अवैध धंदे वाल्या विरोधात बंड केल्याने अवैध धंदेवाले थंड होणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

गुटखा साठवणे व चोरट्या मार्गाने विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा असल्यामुळे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यावर मुखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे हे करीत आहेत.