Home विदर्भ अवधुतवाडीचे ठाणेदार आनंदराव वागतकर, घाटंजीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त...

अवधुतवाडीचे ठाणेदार आनंदराव वागतकर, घाटंजीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नाकारला…!

424
0

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ :– यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंदराव एम. वागतकर व घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज यवतमाळचे प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहीउद्दीन एम. ए. यांनी फेटाळला. या प्रकरणात शासनाकडुन सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी युक्तिवाद केला.
⚫ यवतमाळ येथील दांडेकर ले – आउट मधील सासरच्या घरी तलाठी विजय गोविंद गाढवे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अगोदर आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. परंतु; मृतकाची आई भिमाबाई गोविंदराव गाढवे हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मुलगा विजय गोविंद गाढवे याचा खुन झाल्याची तक्रार CWP/202 /2019 दाखल केली. या प्रकरणात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद होउन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे, अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने ठाणेदारासह ईतर आरोपी विरूध्द गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले.
त्यावरुन आरोपी विरूध्द भादंवि ३०२, ३०६, १६६ व १६७ अन्वये अवधुतवाडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार आनंदराव मुकूंदराव वागतकर, घाटंजीचे ठाणेदार दिनेशचंद्र रघुवरदयाल शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावडे, पोलीस हवालदार सतिष चौधरी व सासरची मंडळीसह आठ आरोपी विरूध्द अवधुतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले होते.
⚫ या प्रकरणी अटक टाळण्यासाठी अवधुतवाडीचे तत्कालीन ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला, ठाणेदार आनंदराव वागतकर यांनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, सदरचा अटकपूर्व जामीन अर्ज यवतमाळचे प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोहीउद्दीन एम. ए. यांनी शनिवारी फेटाळून लावला. या प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी युक्तिवाद केला, तर आरोपी ठाणेदार यांची बाजु अँड. ईम्रान देशमुख, अँड. मनिष जैस्वाल यांनी मांडली.
तथापि, संबधित आरोपींना उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे, असे दिसुन येते.