Home विदर्भ मालखेड (रेल्वे) येथील श्रीक्षेत्र अंबादेवी मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात यावा

मालखेड (रेल्वे) येथील श्रीक्षेत्र अंबादेवी मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात यावा

87
0

चांदुर रेल्वे –  निखिल वाहने

रा.यु.काॅं.प्रदेश सरचिटणीस विनय कडू यांचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन

अमरावती – चांदुर रेल्वे तालुक्यातील मालखेड रेल्वे येथील श्रीक्षेत्र अंबादेवी मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय युवा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विनय कडू यांनी खनिकर्म, पर्यटन, उद्योग, फलोद्यान, क्रीडा व युवक कल्याण व माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे निवेदन घेऊन केली आहे.


अंबा देवी मंदिर ऐतिहासिक असून पुरातन काळापासून येथील अंबादेवी मूर्तीची स्थापना झाली आहे, यापूर्वी यातील तीर्थक्षेत्राला ‘क’ दर्जा मध्ये समावेश करण्यात आला. भाविकांची वाढती संख्या पाहता आणि संस्थांवर असलेल्या भौतीक उपलब्धताची पुर्तता करण्याच्या दृष्टीने या संस्थानला तीर्थ-क्षेत्र ‘ब’ वर्ग दर्जा मध्ये समावेश करून विकास व्हावा म्हणून अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनय कडू यांनी राज्यमंत्री आदिती ताई तटकरे यांना निवेदन देऊन केली आहे, यावर आदिती ताई तटकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याची माहिती मिळाली आहे.