Home विदर्भ भांबोरा सॅनेटायझर प्रकरणात बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा –...

भांबोरा सॅनेटायझर प्रकरणात बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा – मनसे

370

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा… घटनेचा निषेध

यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील भांबोरा उपक्रेंद्रा अंतर्गत कापशी या ठिकाणी पोलिओ डोज च्या दिवशी लहान बालकांना चक्क सॅनेटायझर पाजण्यात आले हा प्रकार धक्कादायक असून आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.या प्रकरणात दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली.
भांबोरा प्रकरणात आरोग्य विभागाने तडकाफडकी कार्यवाही चा आव आणत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बळी दिल्याचा आरोप या प्रसंगी करण्यात आला. वास्तविकतेत या घटनेत या उपकेंद्राचे डॉ. मनवर यांचा गलथन कारभार जबाबदार असून या कर्मचाऱ्यांचे पोलिओ प्रशिक्षण घेणे गरजेचे होते तेच घेण्यात आले नव्हते हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात प्रशासनाने डॉ. मनवर आणि इतर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणे आवश्यक होते परंतु यात त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेने केला भांबोरा उपकेंद्रा प्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र असाच गोंधळ सुरू असून संपूर्ण जिल्ह्यातील उपकेंद्राच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी ही या प्रसंगी करण्यात आली.या प्रसंगी बोलताना मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रकरणात दोषींना तात्काळ बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि डॉ. मनवर यांच्या कारभाराची चौकशी ची मागणी या प्रसंगी केली. या प्रकरणात मनसेने माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीनुसार डॉ. मनवर हे मुख्यालयी हजर राहत नसून खालच्या कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर उपकेंद्राचा कारभार चालवतात हा सर्व प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांना मनसेने या प्रकरणात तात्काळ कार्यवाही ची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रसंगी प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, विकास पवार, अभिजित नानवटकर, सादिक शेख, सचिन एलगंधेवार, अमित बदनोरे, संदिप भिसे, सौरभ पत्रकार यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.