Home नांदेड माहूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीचे आगमन व कोरोना प्रतिबंधित लस अभियानाला सुरुवात.

माहूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीचे आगमन व कोरोना प्रतिबंधित लस अभियानाला सुरुवात.

152

मजहर शेख

नांदेड/माहूर,दि : ३ :- देशासह राज्यात थैमान घातलेल्या कोरोना या माहामारीची प्रतिबधक लक्षीचे दि.३ जानेवारी रोजी माहूर येथील ग्रामिण रुग्णालयात उद्घाटन करण्यात आले.

या वेळी पहिली लस ग्रामिण रुग्णालयाचे डॉ निरंजन केशवे यांना देण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरध्यक्ष कु शितल जाधव उद्घाटक तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर,प्रमुख पाहुणे सभापती सौ.लिलाबाई राठोड,डॉ मुंडे मुख्याधिकारी विद्याताई कदम, रुग्णकल्याण समिती सदस्य नंदकुमार संतान किसन राठोड प्रकाश जैन साहेबराव भिसे यांची उपस्थिती होती.
माहूर तालुक्यात कोरोणा विषाणूच्या लसीचे प्रथमच अगमण झाल्याने त्या लसीचे दि ३ जानेवारी रोजी ग्रामिण रुग्णालयात उद्घाटन क‌रण्यात आले सर्व प्रथम हि लस आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात येणार असुन दुसऱ्या टप्प्यात पोलिस,महसुल , नगरपंचायत आशा कर्मचारी वर्गाना देण्यात येणार आहे तर हि लस अत्यंत सुरक्षित असुन कोराणा विषाचा समुळ उच्चाटन करण्यासाठी मदत करावी असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ व्यकंटेश भोसले यांनी केले आहे या वेळी डॉ.किरण कुमार वाघमारे, डॉ पद्माकर जगताप , डॉ अजय जाधव, सुमित राठोड,समर त्रिपाठी, वैजेनाथ स्वामी, पत्रकार व आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती.