Home जळगाव मदरसा अबूबकर सिद्दिकी मासूम वाडी येथील आठ विद्यार्थ्यांचे खतमे कुराण

मदरसा अबूबकर सिद्दिकी मासूम वाडी येथील आठ विद्यार्थ्यांचे खतमे कुराण

171

त्या विद्यार्थांना निरोप

रावेर (शरीफ शेख )

जळगाव मासूम वाडी येथील मस्जिद मध्ये मदरसा अबूबकर सिद्दिकी हा लहान मुलं आणि मुलींसाठी चालवला जात असून सदर मदरसा हा दीनियात फाईनटच यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या मदर्शा चे हाफिज वसीम पटेल हे प्रमुख असून त्यांना सहाय्यक करणारे हाफिज अब्दुल अजीम हे आहेत. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत हा मदरसा चालू असून सुमारे ११० विद्यार्थी मदर्सचे शिक्षण घेत आहेत.
२०११ पासून सुरू असलेल्या या मदरसाच्या द्वारे आतापर्यंत सुमारे शंभरच्यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण कुराण पठण झाले असून ते आता हाफिज अथवा इतर उच्चशिक्षणासाठी दुसरीकडे प्रवेश घेतलेला आहे.
या लहान विद्यार्थ्यांमध्ये तिसरीपासून दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

*आठ विद्यार्थी विद्यार्थ्यांचे झाले खतमे कुराण*

आज २ फेब्रुवारी रोजी या मदरशांमधील आठ विद्यार्थ्यांचे खतमे कुरान म्हणजे पवित्र कुराणाचे ३० पारे वाचून संपले.

अशा या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार वस्तू रुपी भेट देऊन करण्यात मुफ्ती अब्दुल मोहसीन,हाफिज शफी व फारूक शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
मुफ्ती अतिकउर रहेमान, साबिर भाई मणियार, मोहसिन अब्दुल सत्तार यांनी पवित्र कुराण भेट म्हणून दिले.
फारुख शेख यांनी आठही विद्यार्थांना व त्यांना शिक्षण देणारे दोघे हाफिज यांना संपूर्ण ड्रेस भेट म्हणून दिला तसेच दोघा शिक्षकांना प्रत्येकी पाचशे रुपये रोख पारितोषिक दिले तसेच ज्या तीन विद्यार्थ्यांनी म्हणजे पवित्र कुराण पठण करणारे शाहिद सैयद, प्रार्थना (स्तुती) करणारे अब्दुल मोहसिन ज्यांनी नात सादर केली ती सिद्धिका शेख इब्राहिम या तिघांचा सुद्धा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. आसिफ भाई ने सुद्धा दोघे मौलाना यांना नजराणा दिला.

* *या आठ विद्यार्थ्यांचा झाला सन्मान*

आरिफ खान अब्दुल आसिफ खान रेहान खान अशपाक खान
अदनान शेख अल्ताफ
मोहम्मद नोमान मोहम्मद इमरान मोहम्मद हरीश शेख आसिफ
रफिक खान आसिफ खान
हमजा शेख जमील
शाहिद सय्यद मौसीन

*कार्यक्रमास यांची होती उपस्थिती*

मुफ्ती अब्दुल मोहसीन,हाफिज शफिक, फारुक शेख,हाफिज वसीम,हाफीज अझीम, साजिद शेख, सय्यद मोहसीन, आसिफ रफिक, इक्बाल सत्तार ,मेहमूद शाह, मंसूर खान ,शेख युसुफ व मोहंमद यांची होती उपस्थिती .

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफिज वसीम पटेल यांनी केले तर आभार साजिद रफिक यांनी मानले.