Home जळगाव सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनानिमित्त फातिमा बी शेख आदर्श पुरस्कार जाहीर

सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनानिमित्त फातिमा बी शेख आदर्श पुरस्कार जाहीर

119
0

रावेर (शरीफ शेख) 

मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद तालुका रावेर या संस्थेच्या वतीने भारतातील पहिल्या सनदी मुस्लिम शिक्षिका फातिमा बी शेख यांच्या नावाने पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.यात प्राथमिक, माध्यमिक शिक्षिका, महिला पोलीस कर्मचारी, आरोग्यसेविका, महिला डॉक्टर्स, महिला पत्रकार,महिला लेखक,कवी, इतिहासकार यांसह विविध क्षेत्रात सक्रीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या साठी दि ३० जानेवारी पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. महिलांना सम्मान देऊन त्यांचा गौरव करणे हे अभिमानास्पद कार्य असून या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.या मध्ये डॉ पाकिजा उस्मान पटेल जि प प्रा.शाळा राजवड,डॉ योगिता संदीप पाटील,(मा.फॉ. संचालिका,रावेर),लुबना अमरीन महेबूब अली(मनपा उर्दू हा.स्कूल नं.२ जळगाव),सौ योजना ताई दत्तात्रय पाटील(मा.सभापती विध्यमान नगरसेविका भडगाव),अफशा तरन्नुम मुनिर खान(जि प उर्दू शाळा नं.२ नशिराबाद),सौ कल्पना दिलीप पाटील(जि प.प्रा.शाळा निंभोल ),मिनहाज परवीन नासिर(.सर.सै.अ.उर्दू प्रा.शाळा यावल),सौ अलका आनंद पाटील(जि प शाळा कढोली ता एरंडोल),निकहत परवीन शे बहाउद्दीन(जि प मु उ शाळा अडावद),श्रीमती नीता राजू काकर(जि प शाळा रुईखेडे),सय्यद वसीम बानो वहिद अस्लम(जि प शाळा नं२ रावेर),श्रीमती रेखा सुभाष रुळे(जि.प मराठी क.शाळा नं१ बोदवड),शफीका परवीन नजीर अहेमद(सर.सै.अ.खान उ प्रा.शाळा ,यावल),नर्गिस शे.इलियास(मौ.अ.क.आ. उ.हा.खिर्डी ता रावेर),शाहीन परवीन सईद अहेमद(जि प उर्दू बा शाळा रसलपूर),निकहत अंजुम नाजीमोद्दीन(जि प उ क शा. नं १ मुक्ताईनगर),निदा बी शेख शफिक (उत्कृष्ठ विद्यार्थ्यांनी जि.प उर्दू शा कर्जोद ) यांचा सहभाग आहे.
कार्यक्रम दि ७ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी १०/ ३० वाजेपासून जि प उर्दू शाळे जवळ सुरू होणार असून या कार्यक्रमात रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे,रावेर-यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी तसेच सौ रंजना ताई प्रल्हाद पाटील जि प अध्यक्षा जळगाव यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात येणार असून कार्यक्रमाला सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी आई आवाहन मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय चे अध्यक्ष शेख शकील शेख अब्दुल्ला यांनी केले आहे.