Home महत्वाची बातमी भाद्याच्या दोन विद्यार्थीनी व शिक्षकाची ‘इस्रो’च्या भेटीसाठी निवड !

भाद्याच्या दोन विद्यार्थीनी व शिक्षकाची ‘इस्रो’च्या भेटीसाठी निवड !

974

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

बिड / भादा (औसा ) , दि. १७ :- सुट्टीविना शाळा म्हणुन महाराष्ट्रभर परिचित असलेल्या भादा प्रशालेच्या शिरपेचात अजून एका सन्मानाची भर पडली आहे .प्रशालेने विविध क्षेत्रात राज्यस्तरापर्यंत उज्वल यश संपादन केले आहे .विज्ञान प्रदर्शनात प्रथम , द्वितीय , तृतीय आलेल्या शाळेतील विद्यार्थ्याना विज्ञानाची ही आवड वृद्धींगत होण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेने कर्नाटकातील बंगलोर येथील इस्रो या जगातील संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या अभ्यास भेटीसाठी नियोजन आखले असुन यासाठी जिल्ह्यातील 60विद्यार्थ्याची व 10शिक्षकांची निवड केली असुन यात भाद्याच्या कन्या प्रशालेतील कु.पाटील आदिती उमाकांत व कु .गौर वैष्णवी चंद्रभूषण या दोन विद्यार्थीनीची व राज्य पुरस्कार प्राप्त प्रयोगशील विज्ञान शिक्षक श्री शिवलिंग नागापुरे यांची निवड झाली आहे.

याच महिन्यात 19ते 23जानेवारी दरम्यान पाच दिवसाची ही शैक्षणिक अभ्यास सहल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या कल्पकतेनुसार आखली असुन जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली जामदार व श्री औदुंबर उकिरडे याबाबत सर्व नियोजन आणि मार्गदर्शन करीत आहेत.या सहली दरम्यान विद्यार्थी इस्रो व्यतिरिक्त जवाहरलाल नेहरू प्लनेटेरीअम अँड सायन्स पार्क , विश्वेश्वरय्या म्युजियम, लाल बाग बॉटनीकल गार्डन , एच.ए.एल.अँरोस्पेस म्युजियम, इंदिरा गांधी म्युजियम फॉण्टन पार्क आदी पाहणार आहेत.
ग्रामीण भागातील भाद्याच्या या विद्यार्थी व शिक्षकाच्या निवडीबद्दल सरपंच दिनकर माळी , उपसरपंच बालाजी शिंदे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लटुरे , उपाध्यक्ष सतीश कात्रे व दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सातपुते यांनी अभिनंदन केले आहे.या सहलीतील 60पैकी 21विद्यार्थी हे जिल्हा परिषदेचे असुन त्यात भाद्याच्या दोन विद्यार्थीनीला व निवडलेल्या 10शिक्षकात भादा प्रशालेच्या एका शिक्षकाला सहभागी होण्याचा सन्मान मिळाला असुन .विज्ञान प्रदर्शन , इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शन , विज्ञान मेळावा , विज्ञान नाट्योत्सव या सर्व स्पर्धेत भाद्याची ही प्रशाला राज्यस्तरापर्यंत अनेक वेळा झळकली आहे.