Home नांदेड सिंदखेड पोलिसांची दहेली येथे मटका व जुगार अड्ड्यावर धाड ,, “दोन आरोपी...

सिंदखेड पोलिसांची दहेली येथे मटका व जुगार अड्ड्यावर धाड ,, “दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल”

281
0

मजहर शेख, नांदेड

नांदेड/किनवट, दि : २:- सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे दहेली येथे अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळताच सिंदखेड पोलिसांनि छापा मारून सुरेश चीनया दिसेवार यांच्या विरुद्ध अवैध मटका जुगार चालवीत असल्याने तेथे धाड टाकली त्यांचे कडून एक हजार दोनशे साठ रुपये (१२६०/-) व साहित्य जप्त करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत उमेश दर्शनलाल जयस्वाल हा अवैध रित्या देशी दारू विकताना पकडला असून त्याच्याकडून 25 देशीच्या दारू बाटल्या किंमत एक हजार दोनशे रुपयेच्या (१२००/-) जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. याकामी सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जयसिंग राठोड,जमादार बबन गुहाडे, नदंगावे, सोनसळे, मोकळे यांनी ही कारवाई केली.पूढील तपास जमादार गुहाडे हे करीत आहेत.