Home जळगाव बोगस शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात – पत्रकार युसूफ शाह

बोगस शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात – पत्रकार युसूफ शाह

182
0

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील सावदा येथील‌ इत्तहाद एज्युकेशन सोसायटी सावदा तालुका रावेर रजि , नं (एफ ,१०८८ )जळगाव या शैक्षणिक संस्था द्वारे संचालीत अंँगलो उर्दू हायस्कूल सावदा मध्ये सन २०१२ पासून काही शिक्षकांची नियुक्ती संचालक मंडळांनी कायद्याला बाजुला ठेवून थेट निर्भयपणे पूर्वनियोजित कट रचून कागदोपत्री खोटेला खरे दाखवले आहे सदर काळा पासून कार्यरत नसलेले या शिक्षकांचे ॲपरोल सहित विविध प्रोसिजर शिक्षण अधिकारी माध्यमिक जि ,प जळगाव यांच्या मदतीने अवैधरित्या पूर्ण करून पगार पोटी बिल मुख्याध्यापकांच्या खोट्या व बनावटी सह्या चे प्रस्ताव सादर करून थेट शासनाची फसवणूक व दिशाभूल करून लाखो रुपयांचा अपहार केलया संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात फौजदारी स्वरूपाची याचिका सुद्धा दाखल असून या बोगस शिक्षकां सहित संचालकांवर सुद्धा मोठी कारवाईची टांगती तलवार कधीही पडू शकते.

शैक्षणिक क्षेत्रात बोगस शिक्षक भरतीचे धक्कादायक प्रकरण शिक्षण विभागाचे काही अधिकारी व शैक्षणिक संस्था चालकांच्या मिलीभगतने दिवसाआळ घडत असल्याचे समोर येत असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहे या मुळे पवित्र शिक्षण क्षेत्राची प्रतिमा मलिंन होत आहे व यात भर टाकण्या साठी शाळेत बोगस शिक्षक भरून इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी मैदानात उतरलेली आहे
या बोगस शिक्षकां पासून शाळेत दर्जेदार विद्या दान ची अपेक्षा कशी करावी? यां मुळे देशाचे भविष्य समजले जाणारे विद्यार्थ्यांचा भविष्य धोक्यात आलेला नाही का? असे एक ना अनेक चिंताजनक व झ संतापजनक प्रशन भेडसावत असून हे विद्यार्थी व पालक हिता साठी फार नुकसानदायक आहेत व या साठी संघटित होऊन प्रत्येक पालकांनी व जागृत नागरिकांनी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड कडे लेखी तक्रारी केल्या पाहिजेत जेणेकरून शिक्षण क्षेत्रात अवैधरित्या सुरु असलेला गलथान व भोंगळ कारभारा वर लगाम कसली जाईल.

धक्कादायक

३० वर्षात जे घडले नाही ते सन २०१९ पासून इत्तेहाद एज्युकेशन संस्था, व अँग्लो शाळा संदर्भात घडलेला आहे की * बोगस शिक्षक भरती बद्दल औरंगाबाद खंडपीठात फौजदारी स्वरूपाची,एक याचिका दाखल केलेली आहे, नाशिक धर्मदाय आयुक्त कडे व रावेर न्यायालय मध्ये एक फौजदारी केस ,जळगाव येथे कलम 41 प्रमाणे एक केस संचालक शेख हारून शेख इक्बाल यांनी दाखल केलेले आहे,तसेच नाशिक येथे, ट्रमिनल कोट , मध्ये एक, व रावेर न्यायालयात एक फौजदारी असे २ केस शिक्षक अक्रम खान यांनी, दाखल केलेले आहे नाशिक धर्मदाय आयुक्त कडे दुसरी एक केस संस्थाचे माजी सचिव यांनी सुद्धा केलेली आहे, तसेच संस्थेने अवैधरित्या बांधलेली नवीन इमारत संदर्भात सुद्धा औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल झालेली आहे.

या नंतर टाळेबंदी काळात शाळा संबंधितांनी विद्यार्थी हक्काचे १२ ते १५ क्विंटल शालेय पोषण आहाराचे तांदूळ विक्री केलेल्या संदर्भात खालपासून वरपर्यंत वेळोवेळी केलेल्या तक्रारी संस्थेने अवैधरित्या बांधलेली नवीन इमारत बद्दल केलेल्या तक्रारी लाक डॉऊन काळात संस्थेचे काही संचालक व शिक्षकांनी घेतलेली अवैध मीटिंग ची पुराव्यानिशी तक्रार मुख्याध्यापकांच्या बोगस शिक्षकांचे प्रस्ताव सहित विविध कागदपत्रांवर, खोट्या व बनावटी सह्या बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव कडे मुख्याध्यापकांनी केलेल्या तक्रारी तसेच ओपन स्पेस वर अतिक्रमण बाबत सावदा पोलीस स्टेशनात संस्थाचे तीन संचालकासह एका शिक्षक विरुद्ध गुन्हा दाखल आहे, अवैधरित्या इमारत बांधकामासाठी वीज चोरी केल्याबद्दल संस्थेला सावदा वीज वितरण कडून तीस हजाराच्या वर झालेला दंड,,बरेच काही ,सांगते .

या सर्व प्रकरणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मास्टरमाईंड, संस्थेत शिरलेला व विद्या दानाचे कर्तव्य पासून अलिप्त मोठा वाघोदा येथून पाल येथे बदली झालेला दांडीबाहोंदर,जि प उर्दू शाळेचा शिक्षक,शेख हनीफ शेख रशीद पिंजारी व त्यास सहकार्य करणारे काही संस्थाचालक कारणीभूत असून त्यांच्यावर कायद्याचे ढग फुटून वाईट प्रसंग येईलच अशे शिक्षण क्षेत्रातील जाकाराकडून बोलले जात आहे

तरी या चीड निर्माण करणाऱ्या सर्व प्रकरणाची पुराव्यानिशी एक भक्कम फाईल तयार करून लवकरच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व महसूल मंत्री ,यांचाशी समक्ष युसुफ शाह व काही जागृत नागरिक भेटून सुरवाती ताळे बंदीकाळा पासून ते आजतागायत मी व इतरांनी केलेल्या एक ही, तक्रारीची जाणीवपूर्वक दखल न घेणाऱ्य अधिकाऱ्यां सह शाळा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहेत असे युसूफ शाह यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.