Home जळगाव एबीपी माझा चॅनलच्या दोन पत्रकारांवर शिर्डी संस्थान प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी...

एबीपी माझा चॅनलच्या दोन पत्रकारांवर शिर्डी संस्थान प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी जाहिर निषेध

566

रावेर (शरीफ शेख) 

गुन्हा मागे घेण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांचे निवेदन

शिर्डी येथील एबीपी माझाचे पत्रकार मुकूल कुलकर्णी व नितीन ओझा या दोन्ही पत्रकारांनी शिर्डी संस्थानच्या कारभाराविषयी, गैरसोईविषयी वृत्तांकन केल्याप्रकरणी
या दोन्ही पत्रकारांविरुध्द तब्बल अडीच महिन्यानंतर शिर्डी संस्थान प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डी संस्थान प्रशासन अश्या पध्दतीने पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करुन माध्यमांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या घटनेचा आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
मुंबई जाहिर निषेध करीत असल्याचं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी निवेदनात म्हटलं आहे.