
मजहर शेख, नांदेड
पोलीस निरीक्षक राख, स.पो.नि. तिडके, यांचा निरोप समारभ संपन्न!
नांदेड/माहूर,दि: २:- माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांची जिल्हा नियंत्रण कक्ष नांदेड येथे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांची सिंदखेड पोलीस ठाण्यात व पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांची वाचक पोलीस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर येथे बदली झाल्याने व माहूर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून नामदेव रिठे यांनी पदभार स्विकारल्याने माहूर पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय व सर्व समाजिक संघटना, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी माहूर पोलीस ठाण्यात निरोप समारंभ व स्वागत सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्ष कु. शितल जाधव ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही.एन.भोसले, स.पो.नि. अण्णासाहेब पवार, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जेष्ठ पत्रकार गोपाळराव कदम, नंदू संतान, भाजप युवानेते अॅड. रमण जायभाये, जयकुमार अडकीने, हे होते. सागर महामुने, मनोज कीर्तने, सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष राजकुमार राठोड, शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव, निसार कुरेशी, करीमशहा तय्यबशहा, फकीर महमद मुजावर, मुजीब फारुकी, जीवन कांदे, जीवन जाधव, आशिष चारभाई, विजय आमले, वसंत कपाटे, नगरसेवक रहेमत अली, इलियास बावानी, अविनाश टनमने, राज ठाकूर आदीसह बहुसंख्य सामाजिक, राजकीय संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जेष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार वरणगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव, निरधारी जाधव, जयकुमार अडकीने, नंदकुमार संतान विजय आमले,नगरसेवक रहेमतअली, मनोज कीर्तने, यांनी समयोचित मनोगत व्यक्त करून बदली झालेल्या तिन्ही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील प्रशासकीय अनुभवाचे कथन करून गुणगौरव केला. यावेळी नूतन पोलीस निरीक्षक रिठे मावळते पोलीस निरीक्षक राख, स.पो.उप.नि. भालचंद्र तिडके, यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्काराचे उत्तर दिले. विविध राजकीय व समाजिक संघटनाच्या प्रतिनिधीनी चारही मान्यवरांचे शाल, पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार केला. माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने पो.हे.कॉ.विष्णू मुटकुळे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे सोशल मिडिया विधानसभा प्रमुख जितु चोले यांनी केले. अध्यक्षीय समारोप नगराध्यक्ष कु. शितल जाधव यांनी केला तर आभारप्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी केले.











































