Home नांदेड नांदेड पोलिस दलातर्फे मुख्यालयात वाहण्यात आली हुतात्म्यांना आदरांजली

नांदेड पोलिस दलातर्फे मुख्यालयात वाहण्यात आली हुतात्म्यांना आदरांजली

146
0

 राजेश एन भांगे

नांदेड येथे पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस दलाच्या वतीने दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी “हुतात्मा दिन” पाळण्यात आला.
ज्या महापुरुषाने देशासाठी हुतात्म्य पत्करले आहे अशा महापुरुषांचा आदर व्यक्त करण्यासाठी हुतात्मा दिन पाळण्यात येतो, यावेळी हुतात्म्यांना मौन धारण करून सन्मानपूर्वक आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, भोकर चे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक (मु.) सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक, द्वारकादास चिखलीकर, स्थानिक गुन्हा शाखेचे सहपोलीस निरीक्षक राजू घटाणे, जनसंपर्क अधिकारी तानाजी बंडे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.