Home विदर्भ आर्णी – केळापूर भाजपाचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांची जामीनावर सुटका…!

आर्णी – केळापूर भाजपाचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांची जामीनावर सुटका…!

762
0

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी – केळापूर भाजपाचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांना केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी तीन महीण्याची शिक्षा कायम ठेवली होती. दरम्यान, या शिक्षे विरुद्ध माजी आमदार प्रा. तोडसाम यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन फौजदरी अर्ज क्रमांक १२/२०२१ दिनांक २८ जानेवारी रोजी दाखल करुन शिक्षेला आवाहन दिले होते. या प्रकरणात ज्येष्ठ वकील अँड. सुनिल मनोहर यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. त्यामुळे केळापूर येथील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायालयाने ३ महिण्याच्या दिलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी अंतरीम स्थगीती देऊन, जामीन मंजूर केला. दरम्यान, अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायालयाची संपूर्ण प्रक्रिया आज पुर्ण केल्यानंतर माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांची यवतमाळच्या कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणात प्रा. राजु तोडसाम यांची बाजू ज्येष्ठ वकील अँड. सुनिल मनोहर यांनी उच्च न्यायालयात मांडली. त्यांना अँड. अक्षय नाईक यांनी सहकार्य केले.
👉🏿 पांढरकवडा येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे लेखापाल विलास आकोत यांना माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी विज धारकांना अधिकचे बिल येत असल्याबाबत विचारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेले होते. लेखापालाने योग्य उत्तर दिले नसल्याने प्रा. तोडसाम यांचे समाधान झाले नाही. त्यावरुन वाद उपस्थित झाला. वादाचे पर्यावसन लेखापाल विलास आकोत यांना अश्लील शिवीगाळ करून, शासकीय कामात हस्तक्षेप करुन हाणामारीत झाले. या बाबत लेखापाल विलास आकोत यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल केला. या वरून आरोपी प्रा. राजु तोडसाम विरुद्ध भादंवि २९४, ३५२, ३५३, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणात पांढरकवडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार संजय खंदाडे यांनी सखोल तपास करुन केळापूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात दहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी माजी आमदार प्रा. राजु तोडसाम हे दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांना भादंवि २९४ कलमातंर्गत ३ महीण्याची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला, तर भादंवि ३५२ कलमातंर्गत ३ महीण्याची शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला.
👉🏿 या प्रकरणात आरोपी प्रा. राजु तोडसाम यांनी केळापूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, या प्रकरणाची सुनावणी होउन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी २१ जानेवारी २०२१ रोजी ३ महीण्याची शिक्षा कायम ठेवली. सुनावणी दरम्यान न्यायालयात उपस्थित असलेले आरोपी प्रा. राजु तोडसाम यांनी जामीनासाठी प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिल्याने प्रा. तोडसाम यांची यवतमाळच्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणात शासनाकडुन सहाय्यक सरकारी वकील रमेश डी. मोरे यांनी, तर आरोपी प्रा. राजु तोडसाम यांचे तर्फे घाटंजीचे अँड. गणेश धात्रक यांनी न्यायालयात बाजू मांडली.