Home विदर्भ निरकार काॅटेक्सच्या अज्ञात वाहनांने घेतला गरीब गुराख्याचा बळी  

निरकार काॅटेक्सच्या अज्ञात वाहनांने घेतला गरीब गुराख्याचा बळी  

618

ईकबाल शेख

वर्धा – तळेगांव (शाप. ) : तळेगांव – आर्वी रोडवरील निरंकार कोटेक्स जिनिंगच्या आमने सामने संत भानुदास महाराज संस्थानच्या मालकीची पडीत जमीन आहे त्या पडित जागेत संस्थेने निरंकार काॅटेक्सच्या संचालकांना वाहने उभी करण्यास वारंवार मनाई करुन सुद्धा निरंकार काॅटेक्स मध्ये येणारे कापुस, रुई गाठ, सरकीचे ट्रक उभे राहत होते.

याच संस्थेच्या पडीत जागेत भानुदास महाराज संस्थानमधील गुराखी शामराव नथ्थुजी कोटजावरे वय ६५ वर्षे हे गुरे चारत होते दरम्यान शुक्रवारला दुपारी ४ ते ४.३० वाजताचे दरम्यान निरंकार काॅटेक्सचे उभे असलेल्या अज्ञात वाहनाने शामराव नथ्थुजी कोटजावरे यांना धडक देवुन अज्ञात वाहन घटना स्थळावरुन पसार झाले. तसेच त्या संस्थेच्या पडीत जागेत उभे असलेले सर्वच वाहने पसार करण्यात आले. सदर घटनेची माहिती तळेगांव पोलीसांना मिळताच तळेगांव पोलीस घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासनी करीता ग्रामीण रुग्णालय आर्वी येथे पाठविण्यात आले. अधिकचा तपास ठानेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पी. एस. आय. पवनराज भांबुरकर, जमादार संदिप महाकाळकर, पोलीस शिपाई मनोज आसोले, श्याम गहाट, अमोल मानमाेडे, सागर वानखडे, राहुल अमोने करीत आहे.