Home विदर्भ शिवजयंती निमित्त भव्य शिवगीत स्पर्धा…..!

शिवजयंती निमित्त भव्य शिवगीत स्पर्धा…..!

355

यवतमाळ , दि.  २९ :-   यवतमाळ येथे भाजपा प्रणित”सांस्कृतिक प्रकोष्ठ द्विस्तरीय शिवगायन स्पर्धा2021″आयोजन करण्यात येत आहे.ही स्पर्धा छत्रपती शिवरायांवरील पोवाडा,पाळणा,शिवस्फूर्ती गीत,आरती,ओवी, ललकारी,अभंग आदी शिवाजी महाराजांविषयी गीतांचा समावेश असेल,स्पर्धेचे नियम सरळ-सोपे असून “महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती सहभाग घेऊ शकेल,वरील पैकी कोणतेही गीत गाऊ शकेल,प्राथमिक फेरी 9 फेब्रुवारी जिल्हा स्तरावर व द्वितीय फेरी 19 फेब्रुवारी ला सतारा या ठिकाणी राज्य स्तरावर होईल,स्पर्धेत मराठी-हिंदी-संस्कृत भाषेत गाता येईल,गीत स्व-रचित असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल,कोणते गीत गाणार त्याची प्रत आधी द्यावी लागेल,वयोमर्यादा कमीत कमी 12 वर्षे पूर्ण असावे,स्पर्धेत लागणारे सर्व साहित्य स्पर्धकाने आणावीत,वाद्यांशीवाय गायिले जाणारे गीत गृहीत धरले जाणार,वयक्तिक गीत साठी वेळ मर्यादा 3 ते 7 मी. व सांघिक(सामूहिक)5 ते 8 मी.राहील,स्पर्धकांविषयी सर्व अधिकार संयोजक/आयोजक यांकडे राहील,वैयक्तिक गीत गायन –बक्षीस  प्रथम – ७०००/द्वितीय – ५०००/- तृतीय – ३०००/- सांघिक गीत गायन -प्रथम – ११०००/- द्वितीय – ७५००/- तृतीय – ५१००/- असे राहील,कोरोना विषयी सर्व नियमांचे काटेकोर पने पालन करण्यात येईल” असे नियम आहेत…या स्पर्धेत तमाम शिवभक्त व कलावंत यांनी प्रचंड संख्येने सहभाग नोंदवावा व आपल्या र्हास होणाऱ्या संस्कृतीचे रक्षण करून प्रसार करण्यास आपले अमूल्य योगदान द्यावेत,करिता आपली नोंदणी डॉ.विनोद उंबालकर,मो.09823832242,दीपालीताई पांडे,मो.08459124146,देवयानीताई जोशी,मो.09420915049,डॉ.विवेक चौधरी,मो.09373857138 यांकडे नोंदवावी असे आवाहन “सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या जिल्ह्याध्यक्षा सौ.स्मिताताई भोयटे मॅडम”यांनी केले स्पर्धा ही भाजपा जिल्हाध्यक्ष मा.नितीनजी भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येईल.