Home विदर्भ “वाळु चोरीला आले पुन्हा उधान” , गृहमंत्र्यांचे आदेशाला महसुल व पोलीस प्रशासनाकडुन...

“वाळु चोरीला आले पुन्हा उधान” , गृहमंत्र्यांचे आदेशाला महसुल व पोलीस प्रशासनाकडुन ठेंगा

825

ईकबाल शेख

वर्धा / तळेगांव (शा.पं) :- नजीकच्या वर्धा नदिला मिसळणार्‍या नदि, नाल्यातुन मागील दिड दोन महिण्यापासुन बंद असलेल्या वाळु चोरीला पुन्हा नव्याने उधान आल्याचे गावात जागो जागी पडुन असलेल्या काळ्या रेतीच्या ढिगार्‍यांवरुन निदर्शनात येत आहे. काहि दिवस शांततेत गेल्यानंतर वाळू चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे परिसरातील वर्धा नदी शेजारील नदि, नाल्यातुन अवैधरित्या वाळूचा उपसा सुरु झाला आहे. यामध्ये शासनाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. नुकत्याच वर्धा येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत महसुल व पोलीस प्रशासनाने जिल्हातील रेती चोरीला लगाम लावुन कठोर कारवाई चे निर्देशन दिले आहे परंतु त्यांच्या त्या आदेशाला महसुल व पोलीस प्रशासनाकडुन ठेंगा दाखविल्याचे रात्रीच्या सुमारास होत असलेल्या रेती चोरीवरुन निदर्शनात येत आहे. तेव्हा याकडे प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्यातील तळेगांव नजीकच्या काहि गावांच्या परिसरातुन वाहत असलेल्या वर्धा नदिला मिसळणार्‍या नदि, नाल्यामधुन मागील काहि काळापासुन मोठ्या प्रमाणात वाळु चोरी होत होती. रात्रीच्या सुमारास नदि पात्रातुन रेती उपसा करुन बिनदिक्कतपणे वाळूची वाहतुक केली जात होती परंतु मागील दिड दोन महिण्यापासुन अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे झालेल्या कारवाह्यांमुळे वाळु चोरीला पुर्णत: लगाम लागला होता पण मात्र आता नव्याने वाळू चोरांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सातत्याने वाळूचोरांचा उपद्रव येथे कायम आहे.दररोज ट्रक्टरद्वारे वाळूची वाहतुक करुन तळेगावसह परिसरातील गावात चढ्या भावात विकल्या जाते.वारंवार कारवाई होवुन सुद्धा पुन्हा पुन्हा रेती चोरांचा उपद्रव कायम राहत असल्याने महसुल व पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असुन कुठेतरी पाणी मुरत असावे असी नागरीकांमध्ये चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन वर्धा नदितील काहि घाटांसह नदि, नाल्यांमधुन लाखो रुपयाची वाळू चोरी झाली पण ठोस कारवाई होत नसल्याने चोरट्यांचा उपद्रव कायम आहे. त्यामुळे रेती चोरट्यांना चांगलेच फावत असल्याने गावात त्यांची दादागिरी वाढली आहे. पुन्हा नव्याने काहि वाळू चोरटे सक्रिय झाल्याने प्रशासनाने कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.