Home विदर्भ आर्णी – केळापूर भाजपाचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांना उच्च न्यायालयाकडून...

आर्णी – केळापूर भाजपाचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

496
0

न्यायालयाने ठोठावलेल्या दंडाची रक्कम न्यायालयात जमा करणे अनिवार्य..?

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ  – आर्णी – केळापूरचे भाजपाचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांना केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी केळापूर यांनी दिलेली तीन महीण्याची शिक्षा कायम ठेउन तीन महीण्याची शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी आमदार प्रा. तोडसाम यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन फौजदरी अर्ज क्रमांक १२/२०२१ दाखल केला. या प्रकरणात प्रा. तोडसाम यांचेतर्फे ज्येष्ठ वकील अँड. सुनिल मनोहर यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. त्यामुळे उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने यवतमाळच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले प्रा. तोडसाम यांना मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात ज्येष्ठ वकील अँड. सुनिल मनोहर यांना अँड. अक्षय नाईक यांनी उच्च न्यायालयात सहकार्य केले.
⚫ पांढरकवडा येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे लेखापाल विलास आकोत यांना माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी विज धारकांना अधिकचे बिल येत असल्याबाबत वाद घातला होता. तसेच लेखापाल विलास आकोत यांना अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामात हस्तक्षेप करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आकोत यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल केली. या वरून आरोपी प्रा. तोडसाम विरुद्ध भादंवि २९४, ३५२, ३५३, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात. सदर प्रकरणात ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांनी तपास करुन केळापूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात दहा दहा साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले. आरोपी माजी आमदार प्रा. राजु तोडसाम हे दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना भादंवि २९४ कलमातंर्गत ३ महीण्याची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला, तर भादंवि ३५२ कलमातंर्गत ३ महीण्याची शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला होता.
⚫ या प्रकरणात आरोपी प्रा. राजु तोडसाम यांनी केळापूरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. मात्र, या प्रकरणाची सुनावणी होउन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २१ जानेवारी रोजी सदरची शिक्षा कायम ठेवली. सुनावणी दरम्यान न्यायालयात उपस्थित असलेले आरोपी प्रा. राजु तोडसाम यांनी जामीन साठी प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने प्रा. तोडसाम यांना यवतमाळच्या कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणात शासनाकडुन सहाय्यक सरकारी वकील रमेश मोरे यांनी बाजू मांडली, तर आरोपी प्रा. राजु तोडसाम तर्फे अँड. गणेश धात्रक (घाटंजी) यांनी युक्तिवाद केला होता. सदर प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.