Home जळगाव रावेर ऊर्दू केंद्रात तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

रावेर ऊर्दू केंद्रात तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

194
0

रावेर (शरीफ शेख) 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव तर्फे आयोजित रावेर तालुक्यातील इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धा अंगलोउर्दू हायस्कूल रावेर येथे दिनांक २५/०१/२०२१ रोजी उत्साहात संपन्न झाली.


इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी असे दोन गट करून शिक्षणाचे महत्व, देशाच्या विकासात देशवासीयांचे योगदान, covid-19, तंत्रज्ञान व तंत्र शिक्षणाचे महत्व या विषयावर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी वकृत्व सादर केले.
इयत्ता पाचवी ते सातवी गटातून पहिली बक्षीस तसबिया ताहली आसिफ जि प उर्दू शाळा कर्जोद दुसरे क्रमांक फिर्दोस जाह निसार शाळा सातपुडा फाऊंडेशन रावेर व तिसरे क्रमांक ऑफिया बी शेख सीमा ब खीजार हायस्कूल चिनावल यांनी पटकाविले .
इयत्ता आठवी ते दहावी गटातून प्रथम बक्षीस मुजासिम नूर शेख यासीन शाळा अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर दुसरे बक्षीसतस्किन जांह शेख कुर्बान शाळा गर्ल्स हायस्कूल रावेर तिसरे क्रमांक ऑफिया बी सरफराज खान जि प उर्दू शाळा खानापूर यांनी प्राप्त केले. स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले रावेर उर्दू केंद्र चे केंद्रप्रमुख रईस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक. एडवोकेट शेर अफगान चेअरमन अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर होत. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण अधिकारी मा.शैलेश दखणे साहेब, महमूद सर मुख्याध्यापक अँग्लो उर्दू हायस्कूल रावेर, नुरजहा मॅडम, इरफान सर, प्रफुल ल मानकर सर, गनी अरमान रावेरी सलाहुद्दीन सर व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. माननीय गट शिक्षण अधिकारी शैलेश दखणे साहेब यांनी यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शफिक सर यांनी केले शेवटी केंद्रप्रमुख रईस सर यांनी सर्वांचे आभार मानले.