Home विदर्भ कोरोना काळात महिला योध्दांसारख्या लढल्या – डॉ.अभिजीत गावंडे

कोरोना काळात महिला योध्दांसारख्या लढल्या – डॉ.अभिजीत गावंडे

247
0

मुक्तांगण फाउंडेशन अंतर्गत महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन….!

यवतमाळ , दि. २८ :- (कार्यालय प्रतिनिधी)  – डॉ.अभिजीत गावंडे यांनी कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर महिला ह्या योध्दासारख्या कशा लढल्या, याचे आदर्श उदाहरण देवून सांगितले. परिचारीकांनी या कोरोनाबाबत मोलाचे काम केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महीलांत असलेली कोरोनाबद्दलची भीती, गैरसमज  कसे दुर करायचे, काय काय खबरदारी घ्यायची, हे पटवुन दिले. तसेच प्रतीबंधक लस जी टप्या टप्याने आपल्या पर्यंत येणार आहे, ती लस घ्यायची आहे. हे यावेळी महिलांना पटवुन दिले. 

यावेळी स्त्री रोग तज्ञ  अश्विनी अभिजित गावंडे, मुक्तांगण फाउंडेशनच्या समन्वयक माधुरी कोटेवार, कुंदा गावंडे,आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक अनिल परचाके,प्रदीप वानखडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम हॉटेल सिध्दीविनायक येथे पार पडला. मुक्तांगण ही संस्था गत काही वर्षापासून समाजउपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विशेषत: महिला विषयक कार्यक्रम राबविते. असाच एक आगळा वेगळा कार्यक्रम या संस्थेच्या वतीने घेण्यात आला. आज स्त्री ह्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून त्यांना फक्त खèया अर्थाने मार्गदर्शनाची नितांत गरज आहे, ही गरज ओळखून मुक्तांगण ही संस्था समोर आली आहे.  या कार्यक्रमाला यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची उपस्थिती होती.  या कार्यक्रमामध्ये महिलांसोबत विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले.खेळ,कृतीगीत,नृत्य सादरीकरण, गीत गायन आदी कार्यक्रमामधून महिलांना आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. मुक्तांगण सस्थेचे अध्यक्ष डॉ.अभिजित अरविंद गावंडे  यांनी  मुक्तांगण सस्था कसे काम करते तसेच याबद्दल चालणारी सखी हेल्पलाईन याबद्दल माहिती सांगितली.
एखाद्या डॉक्टर दांम्पत्याने हळदी कुंकवासारख्या कार्यक्रमाला येणे दुलर्भच म्हणावे लागेल.  आपल्या जिवनात आरोग्याचे महत्व काय? आहार कसा असावा, स्वच्छता कशी बाळगावी, यासह अनेक बाबींवर यावेळी मंथन करण्यात आले. तथा डॉ.गावंडे दांम्पत्यांनी यशोचित मार्गदर्शन केले. 
कार्यक्रमाचे संचालन माधुरी कोटेवार तर आभार प्रदर्शन अमोल कावलकर यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती. 

स्त्रीया अबला नसून सबला-डॉ.अश्विनी गावंडे

 या कार्यक्रमामध्ये डॉ.अश्विनी गावंडे यांंनी महिलांच्या आरोग्याविषयी माहिती दिली.  स्त्री ही अबला नसून सबला आहे, पुर्वीच्या काळात चुल आणि मुल एवढीच जबाबदारी स्त्रीयांची होती. आता असे राहिले नसून जग पादाक्रांत करायला ही स्त्री निघाली आहे. त्यांना फक्त मार्गदर्शन करण्याची जरूरत आहे. यात प्रामुख्याने स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कुटूंबाच्या जबाबदारीची जाणिव ठेवून मुलांचे उज्वल भविष्य कसे घडवावे, याची कल्पना स्त्रीयांना चांगलीच असते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साध्या जगाला उध्दारी हे उगाचच नव्हे.