Home महाराष्ट्र प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर

62
0

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 21 जणांचा समावेश आहे. तर विशेष शौर्य गाजविणाऱ्या 18 वर्षाखालील मुलांसाठी दिला जाणारा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांत महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. तसेच पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना देखील राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रपती पोलिस पदक विजेते
डॉ. रवींद्र शिसवे (पोलिस सहआयुक्त, पुणे), प्रविणकुमार पाटील (पोलिस उपायुक्त, नवी मुंबई), वसंत जाधव (पोलिस उपायुक्त, भंडारा), कल्पना गाडेकर (अँटी टेररिस्ट स्कॉड, सायबर सेल, नवी मुंबई), संगिता शिंदे-अल्फोन्सो (पोलिस उपायुक्त, जात पडताळणी समिती), दिनकर मोहिते (पोलिस निरीक्षक, सिबिडी, बेलापूर), मेघ:श्याम डांगे (पोलिस निरीक्षक, अक्कलकुवा, नंदुरबार), मिलिंद देसाई (पोलिस निरीक्षक, शेड्युल ट्राईब छानणी समिती), विजय डोळस (पोलिस निरीक्षक, निजामपुरा पोलिस स्टेशन), रविंद्र दौंडकर (पोलिस निरीक्षक, वाशी), तानाजी सावंत (पोलिस निरीक्षक, कोल्हापूर), मनीष ठाकरे (पोलिस निरीक्षक, अमरावती शहर), राजू बिडकर (पोलिस निरीक्षक, डि.बी मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई), अजय जोशी (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, अंधेरी, मुंबई), प्रमोद सावंत (पोलिस निरीक्षक, टेक्नॉलॉजी सेल, मुंबई), भगवान धबडगे (पोलिस निरीक्षक, देगलुर, नांदेड), रमेश कदम (पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे), रमेश नागरुरकर (राखीव पोलिस दल, मुख्यालय, बुलडाणा), सूर्यकांत बोलाडे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, रेल्वे पोलिस घाटकोपर), लीलेश्वर वारहडमरे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, चंद्रपूर), भारत नाले (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा)

Unlimited Reseller Hosting