Home विदर्भ दोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका

दोन्ही रामकृष्ण च्या जाण्याने मानव विकास आश्रम पोरका

226

अत्रे बाबांच्या इच्छेनुसार मौन साधना शिबिर. 26 तारखेला श्रद्धांजली.

ईकबाल शेख

वर्धा – तळेगाव शा.पंत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचार-कार्याचे कार्यकर्ते निर्माण व्हावे व ग्राम विकासात्मक कार्यात त्यांचा सहभाग वाढावा या उद्देशातून स्थापन करण्यात आलेला तळेगाव शामजी पंत येथील मानव विकास ज्ञानसाधना आश्रमाचे दोन्ही रामकृष्ण आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांचे दोन वर्षांआधी महानिर्वाण झाले. त्यांच्या द्वितीय पुण्यतिथी पर्वात पूज्य रामकृष्णदादा च्या कार्याला पुढे नेणारे ग्रामगीता दास आचार्य रामकृष्ण दादा अत्रे महाराज दिनांक 15/ 1/ 2021 ला वयाच्या 72 व्या वर्षी अचानक निधनाने मानव विकास ज्ञान साधना आश्रम पोरका झाला आहे. आचार्य रामकृष्ण अत्रे महाराजांच्या अंतिम इच्छेनुसार दहा दिवसाचे मौन साधना शिबिर व सामूहिक श्रद्धांजली सोहळा दिनांक 26 /1/ 2021 ला सकाळी 10 ते 1 या वेळेत श्री सुरेश पंत मांडळे. श्री बा.या. वागदरकर, सुश्री ममता ताई नेताम,श्री नरेंद्र बेलुरकर, आचार्य हरिभाऊदादा वेरुळकर, श्री माणिक दास बेलुरकर, श्री प्रफुलदादा वाघदरे व समस्त ग्रामवासी तळेगाव शामजी पंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. 1993 मध्ये सुरू झालेल्या या दोन्ही राम कृष्णाच्या जोडीने आज पर्यंत पाच हजाराच्या वर मुलांना सुसंस्कार चे धडे दिले. युवकांना व्यसनापासून मुक्त केले. ग्रामगीतेचा प्रचार, प्रसार करणारी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. 20 च्या वर गावे ही आदर्श मय केली.वाचनालय, व्यायाम शाळा, व्यसन मुक्ती केंद्र ,आदर्श गाव संकल्पना गावा गावात राबविली. दोन्ही राम कृष्णाच्या जोडीने वंदनीय राष्ट्रसंत गाडगेबाबा चा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून शेवटपर्यंत जनतेपुढे मांडला.